हे आहेत 'पेटा इंडिया २०२०' चे सर्वेत्कृष्ट शाकाहारी सेलिब्रिटी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

अभिनेता सोनू सूद आणि श्रद्धा कपूर यांना पेटा इंडिया २०२० सर्वेत्कृष्ट शाकाहारी सेलिब्रिटी म्हणून गौरवण्यात आलं.

मुंबई :  अभिनेता सोनू सूद आणि श्रद्धा कपूर यांना पेटा इंडिया २०२० सर्वेत्कृष्ट शाकाहारी सेलिब्रिटी म्हणून गौरवण्यात आलं. हजारो मते मिळवल्यानंतर सूद आणि कपूर यांना पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स (पेटा) तर्फे भारतातील सर्वात प्रसिद्ध स्टार म्हणून नाव मिळविलं. पेटा इंडियाने त्यांच्या ट्विटर पेजवर ही घोषणा केली.

पुरुष गटात सर्वाधिक लोकप्रिय शाकाहारी सेलिब्रिटी म्हणून सूदचे नाव जाहीर करण्यात आले आहे, तर अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचे नाव महिला गटात जाहीर करण्यात आले. हा क्षण साजरा करण्यासाठी सूदने ट्विटरवर जाऊन पशू क्रूरतेविरूद्ध काम करणार्‍या पेटाने त्याला दिलेली ट्रॉफी शेअर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, मानुषी छिल्लर, सुनील छेत्री, अनुष्का शर्मा, कार्तिक आर्यन, विद्युत जामवाल, कंगना रनौत, शाहिद कपूर, रेखा यांचा या पुरस्काराच्या मागील वर्षांच्या विजेत्यांमध्ये समावेश आहे.

 

अधिक वाचा :

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी करण जोहरला एनसीबीकडून समन्स

 

 

संबंधित बातम्या