अभिनेता सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

नमस्कार मित्रांनो, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यातच सर्वसामान्यांपासून ते अनेक कलाकांरापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता अभिनेता सोनू सूदलाही कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मिडियावरुन सोनूने कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

सोनू सूदने(Sonu Sood) सोशल मिडियावरील ट्विटर आकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. नमस्कार मित्रांनो, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. चिंतेचे कोणतेही कारण नाही. आता माझ्याकडे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी वेळच वेळ आहे. लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारची समस्या असली, तरी मी तुमच्यासोबत आहे’  या आशयाची पोस्ट केली आहे. ( Actor Sonu Sood Corona Positive)

''कंगनाच्या बुध्दीला लॉकडाऊन लागलांय''

बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू खऱ्या आयुष्यात मात्र अनेकांसाठी सुपरहिरो ठरला आहे. त्याने लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास मदत केली तर काही बेरोजगांराना त्याने रोजगार मिळवून दिला. त्याचबरोबर त्याने परदेशामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत येण्यास मदत केली होती.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, गोविंदा, कतरिना कैफ, विक्रांत मेसी यांना कोरोनाची लागण झाली आहे. आणि आता सोनू सूदला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

 

संबंधित बातम्या