राणादा-पाठक बाईचं ठरलं; आता होणार दोनाचे चार हात!

अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि तिचा सहकलाकार अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) यांचा साखरपुडा आज पार पडला.
राणादा-पाठक बाईचं ठरलं; आता होणार दोनाचे चार हात!
Akshaya Deodhar & Hardik Joshi Dainik Gomantak

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि तिचा सहकलाकार अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) यांचा आज साखरपुडा पार पडला. या मालिकेच्या माध्यमातून या दोघांना खूप प्रसिध्दी मिळाली. मालिका संपल्यानंतरही अक्षया आणि हार्दिक चर्चेत राहीले. यातच आता त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Actress Akshay Deodhar and actor Hardik Joshi got engaged)

दरम्यान, या मालिकेमुळे अक्षया आणि हार्दिक घराघरांत पोहोचले होते. त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दुसरीकडे, मालिका संपल्यानंतरही ते नेहमी चर्चेत होते. स्टायलिश फोटोसाठी अक्षया सोशल मीडियावर (Social Media) सतत चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर या दोघांची चर्चा सुरु झाली आहे. आणि विशेष म्हणजे कारणही खास आहे. कारण, नुकताच दोघांचा साखरपुडा झाला.

Akshaya Deodhar & Hardik Joshi
Nargis Death Anniversary: संजय दत्तने आईच्या आठवणीत शेअर केले काही क्षणचित्रे

तसेच, अक्षया आणि हार्दिक यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्यांचा स्टायलिश अंदाजही पाहायला मिळत आहे. फोटोमधील त्यांची केमेस्ट्री चाहत्यांना चांगलीच आवडली आहे. त्यातच आता त्यांच्या साखरपुडा पार पडला असल्याचे समोर आहे. विशेष म्हणजे हार्दिकने त्याच्या सोशल मीडिया आकाऊंटवरुन एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com