गौहर खान आणि जैद दरबारचं डिजीटल वेडिंग कार्ड बघितलंत का ?

वृत्तसंस्था
रविवार, 20 डिसेंबर 2020

येत्या 25 डिसेंबरला अभिनेत्री आणि 'बिग बॉस' ची स्पर्धक राहिलेली गौहर खान आणि गायक इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद दरबार यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

मुंबई :  येत्या 25 डिसेंबरला अभिनेत्री आणि 'बिग बॉस' ची स्पर्धक राहिलेली गौहर खान आणि गायक इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद दरबार यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नाला सहाच दिवस बाकी असताना काल आपल्या मिडियावरून त्यांनी आपल्या लग्नाची डिजीटल व्हिडीओ आमंत्रण पत्रिका शेअर केली. याला #जब वी वेट असं कॅप्शन दिलंय. सध्या सगळीकडे या लग्नपत्रिकेची चर्चा सुरू आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

या अ‍ॅनिमेटेड व्हिडिओमध्ये त्यांच्या 'लॉकडाउन लव्ह स्टोरी'बद्दल सांगिलंय. ते कसे भेटले इथपासून त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेईपर्यंत घडलेल्या सर्व गोष्टींबद्दल माहिती दिली आहे. फोन करणे, शॉपिंग मॉल मध्ये एकत्र दिसणे, कोणी कोणाला प्रपोज केलं, सा सगळ्या गोष्टी यात दाखवण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे 25 डिसोंबरला अगदी मोजक्या लोकांचया उपस्थितीत मुंबईताल एका हॉटेलमध्ये ते विवाहबद्ध होणार आहेत.

संबंधित बातम्या