गौहर खान आणि जैद दरबार अखेर विवाहबंधनात अडकले

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

अभिनेत्री आणि 'बिग बॉस' ची स्पर्धक राहिलेली गौहर खान आणि गायक इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद दरबार यांचा लग्नसोहळा आज मुंबईत पार पडला.

मुंबई :  अभिनेत्री आणि 'बिग बॉस' ची स्पर्धक राहिलेली गौहर खान आणि गायक इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद दरबार यांचा लग्नसोहळा आज मुंबईत पार पडला. त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो नुकताच व्हायरल झाला आहे.
 
सहाच दिवस बाकी असताना काल आपल्या मिडियावरून त्यांनी आपल्या लग्नाची डिजीटल व्हिडीओ आमंत्रण पत्रिका शेअर केली होती. याला #जब वी वेट असं कॅप्शन दिलं होत. सगळीकडे या लग्नपत्रिकेची चर्चा सगळीकडे सुरू असल्याने त्यांच्या लग्नाबाबत सगळीकडे उत्सुकता होती, अखेर, हे दोघं विवाहबंधानात अडकलेत. त्यांनी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा केला होता.
 

 

संबंधित बातम्या