काम्या पंजाबीने वीर दासच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्याचे केले समर्थन!

अभिनेत्री काम्या पंजाबीने कॉमेडियन वीर दासचे भारत विरोधात कालेले वक्तव्याचे समर्थन केले आहे, त्यात चूक काय?
काम्या पंजाबीने वीर दासच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्याचे केले समर्थन!
Vir Das And Kamya PunjabiDainik Gomantak

कॉमेडियन अभिनेता वीर दासच्या (Vir Das) समर्थनार्थ अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Punjabi) समोर आली आहे. कॉमेडियन (Comedian) वीर दासने अमेरिकेत दिलेल्या त्याच्या वादग्रस्त भारतविरोधी एकपात्री अभिनयामुळे चर्चेत आला आहे. भारतविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही लोकांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन देखील केले आहे.

जॉन एफ केनेडी सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात वीर दासने देशाच्या दोन विरुद्ध बाजूंबद्दल सांगितले, आमचे पुरुष दिवसा महिलांची पूजा करतात परंतु रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतात. काम्याने वीरदासच्या विधानाचे समर्थन केले आहे आणि म्हणाली, “मी या मुद्द्यावर सहमत आहे, होय भारताच्या दोन बाजू आहेत. (Vir Das And Kamya Punjabi) अशी एक बाजू आहे ज्याचा आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही मरण्यास तयार आहोत आणि एक बाजू आहे जी बदलण्यासाठी आम्ही आशा करतो आणि कठोर परिश्रम करतो, तर त्यात चूक काय आहे?”.

Vir Das And Kamya Punjabi
Katrina-Vicky Wedding: व्हीआयपी पाहूण्यासाठी खास व्यवस्था

हा व्हिडिओ पैपराजी अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. काम्याच्या या व्हिडिओला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी काही लोकांनी तिचे वक्तव्य चुकीचे म्हटले आहे. एका यूजरने लिहिले की, वीर दास यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नकारात्मक बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला.

जर कोणी भारताचे प्रतिनिधित्व करत असेल तर त्याने देशाची 80 टक्के सकारात्मक बाजू दाखवावी आणि 20 टक्के नकारात्मक बाजू उघड करू नये. प्रत्येक देशाच्या कायद्यांमध्ये काही किरकोळ त्रुटी असतात ज्या इतरांपासून लपवल्या पाहिजेत. आपल्यातील उणिवा आपण दुरुस्त केल्या पाहिजेत ज्या पूर्णपणे आपल्यावर आहेत. मग कोणी नॉन इंडियन तुमच्या चुकांवरती हसलेल आवडल का? यासाठी तुम्ही तयार व्हा. दुसऱ्याने म्हटल की बेसलेस स्टेटमेंट असते.

या आठवड्याच्या सुरुवातीला वीरने त्याच्या यूट्यूबवर आय कम फ्रॉम टू इंडिया या शीर्षकाचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ वॉशिंग्टन डीसी येथील जॉन एफ केनेडी सेंटरमधील त्याच्या अलीकडील शो मधीलच होता. जिथे वीर म्हणाला, मी अशा भारतातून आलो आहे जिथे आपण दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com