अभिनेत्री कंगना रणावतला कोरोनाची लागण

दैनिक गोमंतक
शनिवार, 8 मे 2021

सामान्य जनतेपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीं कलाकांरापर्यंत प्रत्येक जण कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत.

राज्यात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना सामान्य जनतेपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीं कलाकारांपर्यंत प्रत्येक जण कोरोनाचा विळख्यात अडकत आहेत. आता बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावतला (Kangana Ranaut) कोरोनाची लागण झाली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. 

कंगना रणावतने कोरोनाची चाचणी केल्यानंतर ती चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. यापूर्वी प्रसिध्द अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhat), रणबीर कपूर (Ranbir Kapoor), कतरिना कैफ (Katrina Kaif), विक्रांत मेसी, विकी कौशल, आर्यन आणि इतर कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. आता त्यांच्यापाठोपाठ कंगना रणावतला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. (Actress Kangana Ranaut contracted corona)

Coronavirus: ''या'' अभिनेत्रीचे संपूर्ण कुटुंब कोरोना...

देशात रोज हजारोच्या संख्येने कोरोना रुग्णांचा मृत्यू होत असून, गेल्या 24 तासामधील आकडेवारी भारतातील प्रत्येक नागरिकाची झोप उडवणारी आहे. अवघ्या चोवीस तासामध्ये चार हजारहूंन अधिक कोरोना रुग्णांना आपेल प्राण गमवावा लागला आहे. देशातील एका दिवसामधील आतापर्यंतचा मृतांचा उच्चांक आहे.

संबंधित बातम्या