नागीन अभिनेत्री मौनी रॉय दुबईतील बॅंकर सूरज नंबियारशी करणार लग्न ?

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

नागीन या हिंदी मालिकेमधील शिवण्या म्हणजेच अभिनेत्री मौनी रॉय यावर्षी दुबईतील बॅंकर सूरज नंबियार यांच्याशी विवाहबंधनाची गाठ बांधू शकते.

मुंबई: यावर्षी आणखी एका सालिब्रिटीचं लग्न होण्याचे संकेत दिसत आहे. नागीन या हिंदी मालिकेमधील शिवण्या म्हणजेच अभिनेत्री मौनी रॉय यावर्षी दुबईतील बॅंकर सूरज नंबियार यांच्याशी विवाहबंधनाची गाठ बांधू शकते. अभिनेत्री मौनी रॉयचे दुबई हे आवडीचे ठीकाण आहे

देशातील लॉकडाउनच्या काळात मौनी रॉय तिच्या बहिण आणि  कुटुंबीयांसोबत दुबईमध्ये होती आणि त्या दरम्यान  तीची वारंवार सूरज नंबियार यांच्याशी  भेट होत राहिली. अभिनेत्री  मौनी रॉय  हिने दुबईमध्ये सूरज नंबियार आणि तीच्या कुटुंबीयांसह नवीन वर्षाचे स्वागत केले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy_my_gold)

मौनी रॉय किंवा सूरज नंबियार यांनी अद्याप कोणत्याही वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. सुत्रांकडून अशी माहीती मिळाली आहे की, सूरज आणि मौनी रॉय यांच्या कुटूंबाचे जवळचे संबध असल्याने ते दोन्ही कुटूंब भेटतअसतात.  म्हणूनच की काय  अभिनेत्री मौनी रॉयने लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 
 

संबंधित बातम्या