अश्लील व्हिडीओ प्रकरणी अभिनेत्री पूनम पांडेला अटक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

पूनम पांडे विरोधात गोव्यामध्ये अश्लील व्हिडीओ शूट करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी तिला ताब्यात घेत तिची चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतर तिला अटक होण्याची शक्यता आहे. पूनम नुकतीच तीचं शूट संपवून गोव्यात परतली होती.    

पणजी- अभिनेत्री पूनम पांडेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आपल्या अत्यंत हॉट आणि बोल्ड व्हिडीओंसाठी ओळखल्या जाणाऱ्या पूनम पांडे विरोधात गोव्यामध्ये अश्लील व्हिडीओ शूट करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी तिला ताब्यात घेत तिची चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतर तिला अटक होण्याची शक्यता आहे. पूनम नुकतीच तीचं शूट संपवून गोव्यात परतली होती.    

काल गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला विंगने पूनम पांडे विरोधात एफआयआर दाखल केली होती. यात तिच्यावर गोव्याच्या  चपोली डॅमवर अश्लील व्हिडीओ शूट केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी चौकशीसाठी गोवा पोलिसांनी तिला आज ताब्यात घेतले आहे. गोव्याच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, चौकशीनंतर तिला कदाचित सार्वजनिक स्थानी अश्लील हरकती केल्याप्रकरणी अटक करण्यात येऊ शकते.  

याशिवाय गोव्याच्या काणकोण पोलीस ठाण्यामध्येही अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्याच्यावर आरोप लावला गेला आहे की, त्याने पूनम पांडेचा अश्लील व्हिडीओ शूट केला आहे. यापूर्वीही पूनमने तिच्या पतीविरोधात मारहाणीचा आरोप केला होता. त्यानंतर तिचा पती सॅमला अटकही करण्यात आली होती. अर्थात त्यानंतर त्यांना सोडूनही देण्यात आले होते.         

संबंधित बातम्या