अभिनेत्री प्राची देसाईची लग्नासाठी अट, जाणून घ्या

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 7 एप्रिल 2021

मला हवा तसा परफेक्ट मुलगा माझ्या आयुष्य़ात यायला हवा.

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री प्राची देसाईने 17 वर्षाची असताना मालिकांमधून अभिनय करण्यास सुरुवात केली. तिने रॉकऑन चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने बऱ्याच चित्रपटामध्ये काम केलं. मात्र प्राचीचे काही चित्रपट हिट ठरले तर काही प्लॉप ठरले. प्राची गेल्या काही काळापासून चित्रपटसृष्टीपासून लांब होती. परंतु तिने एका वेबसीरीजमधून चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्राचीने खासगी तसेच प्रोफेशनल लाइफबद्दल सांगितले आहे.

मुलाखतीमध्ये प्राचीला तु लग्न कधी करणार आहे ते विचारण्यात आले त्यावर तिने, ‘माझ्या कुटुंबीयांनी मला ज्याप्रकारे लहानाचे मोठे केले, ते पाहून लग्न करणे मला सुरक्षित वाटत नाही. जेव्हा माझ्या आयुष्य़ात अत्यंत वाईट काळ सुरु असेल किंवा माझ्य़ा खासगी आयुष्यात अनेक अडचणी असतील तेव्हा मी लग्न करु शकते. मी एकदम साध्या, सरळ कुटुंबातून आले आहे आणि इथपर्यंत पोहचणं हे माझ्यासाठी खूप संघर्षमय होतं’  असे उत्तर दिले. (Actress Prachi Desais condition for marriage know)

सना खान नंतर अजून एका कलाकाराने धर्मासाठी सोडला अभिनय

ती पुढे म्हणाली, ‘मी माझ्य़ा अभिनयाच्या कौशल्यावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. माझ्या कुटुंबीयांनी माझ्यावर लग्नासाठी कधीही दबाव टाकला नाही. तसेच मला लग्नाविषयी कधी विचारले ही नाही. मला माझे आयुष्य माझ्यापध्दतीने जगायला आवडते. काही वर्षानंतर मी लग्न करण्याचा जरुर विचार करेन. परंतु मला हवा तसा परफेक्ट मुलगा माझ्या आयुष्य़ात यायला हवा.’

अभिनेत्री प्राची देसाईने रॉकऑन, वन्स अपऑन अ टाईम मुंबई, बोल बच्चन, तेरी मेरी कहानी, एक विलन, रॉकऑन2, कार्बन अशा अनेक चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही दिवसांपूर्वीच प्राचीची ‘सायलेंस’ ही सिरीज प्रदर्शित झाली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prachi Desai (@prachidesai)

 

संबंधित बातम्या