अभिनेत्री सविता मालपेकर लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये

अवित बगळे
बुधवार, 22 जुलै 2020

येत्या 25 किंवा 26 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत.

मुंबई

रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री सविता मालपेकर आता राजकारणात उतरणार आहेत. येत्या 25 किंवा 26 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत.
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ सविता मालपेकर यादेखील या पक्षात प्रवेश करीत आहेत. "चित्रपटसृष्टीत काम करीत असताना काही कलावंतांना अनेक प्रश्‍न भेडसावत असतात. मात्र, त्या कलाकारांचे प्रश्‍न सुटत नाहीत. त्यांच्यापर्यंत कुणी पोहोचत नाही. काही वयोवृद्ध कलाकारांना पेन्शनही मिळत नाही. त्यामुळे या कलाकारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे,' असल्याचे सविता मालपेकर म्हणाल्या.
कोरोनाच्या संकटकाळात अडचणीत असलेल्या कलावंतांसाठी काही करणे अत्यंत गरजेचे असल्याचे या काळात माझ्या लक्षात आले. त्याकरिता एखाद्या राजकीय पक्षाचे सहकार्य असणे आवश्‍यक आहे. त्याकरिता मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे. माझे आवडते नेते शरद पवार आहेत, म्हणून मी या पक्षात जात आहे. मी कुठल्याही पदासाठी नव्हे तर कलाकारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राजकारणात जात असल्याचे मालपेकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या