अभिनेत्री स्कारलेट जॉन्सनने गुप्तपणे केला तिसरा विवाह

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

स्कारलेटने या लग्नाची कोणतीच घोषणा केली नव्हती. गेल्या आठवड्यातच तिने खासगी समारंभात लग्न केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. स्कारलेट 2017पासून कॉलिनला डेट करत होती.

मुंबई - ब्लॅक विडो ही भूमिका साकारून जगभरात नावलौकिक मिळवलेल्या स्कारलेटने तिस-यांदा लग्न केले आहे. आपल्या  लग्नाच्या बाबतीत तिने अतिशय गुप्तता पाळली होती. स्कारलेटने अमेरिकन कॉमेडियन कॉलिन जोस्टसोबत संसार थाटला  आहे.  

स्कारलेटने या लग्नाची कोणतीच घोषणा केली नव्हती. गेल्या आठवड्यातच तिने खासगी समारंभात लग्न केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. स्कारलेट 2017पासून कॉलिनला डेट करत होती. मिल्स ऑन व्हील्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर स्कारलेटच्या लग्नाविषयीची माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून स्कारलेटवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

२008  मध्ये स्कारलेटने रायन रेनॉल्ड्सशी लग्न केलं होतं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर 2011 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2014 मध्ये तिने रोमेन डॉरिअॅकशी लग्न केलं. हे लग्नसुद्धा केवळ तीन वर्षे टिकलं. 2017 मध्ये स्कारलेटने घटस्फोट दिला. स्कारलेट आणि रोमेनला एक मुलगी असून रोझ असं तिचं नाव आहे. स्कारलेट आता 34 वर्षांची असून कॉलिन 38 वर्षांचा आहे. कॉलिनचं हे पहिलंच लग्न आहे.

संबंधित बातम्या