Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचा शुटींग दरम्यान अपघात

'मी लवकर बरी होऊन परत येईन तो पर्यंत दुआ में याद रखना'
Shilpa Shetty
Shilpa ShettyDainik Gomantak

भारतीय सण आपल्या खास पद्धतीने साजरी करणारी अन् बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयनाने वेगळं स्थान निर्माण केलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नुकताच एक अपघात झाला आहे. याबाबत तीने स्वत: माहिती दिली आहे. हा अपघात शुटींग दरम्यान झाला असल्याचं ही तीने म्हटले आहे.

(Actress Shilpa Shetty met with an accident during shooting)

Shilpa Shetty
अनुराग कश्यप म्हणाले, निर्माते 'बॉयकॉट'ला घाबरतात, मृत्यूच्या 2 वर्षांनंतरही सुशांत सिंह राजपूत...

शिल्पा शेट्टीने दिलेल्या माहितीनुसार हा अपघात शुटींग दरम्यान अपघात झाला असून या अपघातामध्ये शिल्पा शेट्टीचा डावा पाय फ्रॅक्‍चर झाला आहे. मागिल अनेक दिवसांपासून रिएलिटी शो मध्ये जज म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे.

Shilpa Shetty
Comedian Raju Srivastava रुग्णालयात दाखल,जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका

आता शिल्पा शेट्टीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून याबाबत तिने स्व:ता याबाबतची माहिती दिली आहे. सोशल मीडियावरती माहिती देताना आपला पाय फॅक्चर झाल्याचं शिल्पाने सांगितलं आहे. शिवाय या अपघातामुळे आता शिल्पाला 6 आठवडे काम करता येणार नाहीये.

दरम्यान, या अपघाताबाबत शिल्पा शेट्टीने एक फोटो ट्विट केला असून या फोटोमध्ये ती एका व्हील चेअरवरती बसल्याचं दिसून येत आहे. तर तिच्या डाव्या पायाला प्लास्टर करण्यात आलं आहे. शिवाय शिल्पा या फोटोमध्ये हसताना दिसून येतेय. हा अपघात झाला असला तरी आपल्या चाहत्यांना मी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी दुआ में याद रखना असे ही म्हटले आहे.

फोटो शेअर करताना शिल्पाने लिहंल आहे की, ‘वो कहते हैं न कि रोल, कैमरा अॅक्‍शन- ‘ब्रेक ए लेग’. मी त्या वाक्याला मी शब्दश: घेतलं असून 6 आठवडे आता काही करु शकणार नाही. तसंच मी लवकर बरी होऊन परत येईन तो पर्यंत दुआ में याद रखना.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com