Rashmi Rocket: शूटिंग दरम्यान तापसी पन्नूला झाली होती दुखापत

रश्मी रॉकेट या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तापसी पन्नूला दुखापत झाली तेव्हा तिने स्वतःला रेससाठी कसे तयार केले जाणून घ्या
Rashmi Rocket: शूटिंग दरम्यान तापसी पन्नूला झाली होती दुखापत
Actress Taapsee Pannu was injured during shooting film Rashmi RocketTwitter/@taapsee

स्पोर्ट्सवर आधारित असलेला रश्मी रॉकेट (Rashmi Rocket) हा रोमांचक चित्रपट झी5वर लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.पण तिला लक्षात येते की धावण्याच्या शर्यतीमध्ये अनेक अडथळे आहेत आणि ते एका एथलेटिक स्पर्धेसारखे वाटते. ही एक स्पर्धा आहे जी तिच्या देशाच्या सन्मानासाठी आणि तिच्या व्यक्तीक सन्मानसाठी लढत आहे.

* शूटिंग दरम्यान तपसीला कशी दुखापत झाली ही जाणून घ्या?

रश्मी रॉकेट या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मुख्य भूमिका साकारणाऱ्या तापसी पन्नूला दुखापत झाली. तिचा अनुभव तिच्याचा शब्दात सांगताना तापसी म्हणाली 'मी एकदा शूटिंग दरम्यान जखमी झाले, कारण पहिल्या तीन दिवसांत मी धावण्यासाठी खूप उत्साही होती. मला खोरोखरच खूप आनंद झाला, म्हणून मला सलग दोन स्प्रिंट्स दरम्यान पुरेशी विश्रांती मिळाली नाही आणि तिसऱ्या दिवशी मला दुखापत झाली. '

Actress Taapsee Pannu  was injured during  shooting  film Rashmi Rocket
नेटकऱ्यांचा संताप; आर्यन खान होतोय ट्रोल

तिने पुढे सांगितले की माझ्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे तिला चलतासुद्धा येत नव्हते. काही आठवते थेरपी आणि विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याच्या वेगवेगळ्या शैलीनी तिची दुखापत कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. तिने चार आठवड्यानंतर शूटिंगला सुरुवात केली. यामुळे चित्रपटमधील अंतिम शर्यतीच शूटिंग चार आठवड्यानंतर करावे लागले होते.

या चित्रपटाची निर्मिती रोनी स्क्रूवाला, नेहा आनंद आणि प्रांजल खंडडिया यांनी केली आहे. त्याचंबरोबर या चित्रपटाची कथा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लन यांनी लिहिली आहे. तापसी पन्नूसह सुप्रिया पाठक, अभिषेक बॅनर्जी, मनोज जोशी, प्रियांशु पैन्युली आणि सुप्रिया पिळगावकर यांच्याही प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट 15 ऑक्टोबर झी 5 वर प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.