हॅपी बर्थडे तबूू; एका अभिनेत्यामुळे आजही तिच्यावर आहे 'सिंगल'चा ठप्पा..

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

तब्बूचे आयुष्यात अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडले गेले असले तरी कुणाशीही तिचं नातं टिकू शकलं नाही. एका मुलाखतीत तिने तिच्या सिंगल राहण्यास दोन जणांना जबाबदार धरले आहे. 

मुंबई-  एकीकडे अजय देवगण आपल्या मुलांसह काजलबरोबर सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे. मात्र, त्याची लहानपणीची मैत्रिण तब्बू आजही त्याच्यामुळे 'सिंगल' आहे. तब्बूचे आयुष्यात अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडले गेले असले तरी कुणाशीही तिचं नातं टिकू शकलं नाही. एका मुलाखतीत तिने तिच्या सिंगल राहण्याला अभिनेता अजय देवगण आणि तिच्या भावाला जबाबदार ठरवले होते. तिने मुलाखतीत सांगितले होते की, आजही अनेक मुली त्या स्थितीतून जात आहेत.    

 काय म्हटली होती तब्बू?

मुलाखतीत तब्बू म्हणाली  होती की, अजय तिच्या चुलत भावाच्या शेजारी राहत होता. ते दोघेही गुप्तपणे तब्बूवर नजर ठेऊन असायचे. अशात ती एखाद्या मुलाशी बोलली तरी ते त्याला नंतर मार देत होते. या कारणामुळे तिची कुणाशी मैत्री जुळली नाही. मुलांनीही तिच्या जवळ येण्याचे बंद करून टाकले. 

तब्बू पुढे म्हणाली होती की, माझ्या आयुष्यात त्यावेळी जो सिंगल असा ठप्पा पडला तो या दोघांमुळे पडला. ज्यामुळे मी त्यांच्यावर नाराजही आहे. तिने भलेही हे विनोदी मूडमध्ये सांगितले असेल. मात्र, मुलगे मित्र असण्याचा मुलींना हो एक तोटाच असतो.   
लागला असता रिलेशनशिपचा ठप्पा- 

जवळच्या मित्रांबरोबर आपण सर्वांत जास्त वेळ घालवतो. त्यांच्याशी फोन वर कनेक्ट राहण्याबरोबरच सिनेमा, जेवायला जाणे, फिरायला जाणे या साधारण गोष्टी आहेत. हीच गोष्ट मुलं मित्र असतानाही घडते. मात्र, मुलगा आणि मुलगी दोघांमध्ये भलेही काही नातं नसेल तरी बघणाऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे संशयाने बघायला लागतात. ज्यामुळे मुलगा आणि मुलगी दोघांवर रिलेशनमध्ये असल्याचा ठप्पा लागून जातो. अशा प्रकरणांमध्ये मुलीला दुसरा कोणताही मुलगा मुलीला अप्रोच होत नाही. 

तब्बूने अतिशय बोल्ड उत्तरे देत, 'मी जर लग्नशिवाय गरोदर राहून बाळाला जन्म द्यायचे ठरवले तर मला कोणीही रोखू शकत नाही', असेही म्हटले होते. तब्बूचे असे बेधडक विधान तिला सर्वांपेक्षा बोल्ड आणि वेगळे ठरवते.       

संबंधित बातम्या