ट्विंकल खन्ना म्हणते.. 'आम्ही वर्षभर हॉलोविन साजरा करतोय'

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

पाश्चात्य देशांमध्ये ३१ ऑक्टोबर हा दिवस 'हॅलोविन डे' म्हणून साजरा केला जातो. मृत व्यक्ती-आप्तेष्ट यांची आठवण ठेवण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.

मुंबई- जगभरात काहूर माजवलेल्या कोरोनाने अनेकांचे जगणे हिरावून घेतले. जे या काळात धडपडताहेत त्यांनाही आयुष्यात अनेक तडजोडी करत जगावे लागत आहे. जगण्याच्या नवनवीन पद्धती उदयाला येत आहेत. असे असतानाही  काही लोक या काळाची तुलना सणांशी करत आहेत. ट्विंकल खन्ना या अभिनेत्रीने आपल्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत सध्याच्या कोरोनाकाळाची तुलना हॅलोविनशी केली आहे.

याबाबत तिने म्हटले आहे, "हॅलोविन जवळ आले आहे. परंतु, २०२० हे वर्ष इतके विशेष आहे, जिथे मास्क, हुडहुडी, भीती व दुसऱ्यांना दंश करण्याऐवजी आत्मा स्वतः सर्दी-खोकल्याने संक्रमित आहे, असे वाटत आहे. आम्ही हे वर्षभर साजरे करत आहोत. 

ट्विंकल खन्ना ही लेखिका, चित्रपट निर्माती तसेच इंटेरियर डेकोरेटर आहे. याआधी तिने अनेक सिनेमांमध्ये अभिनयही केला आहे. तसेच ती दिवंगत अभिनेते राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांची मुलगी तर, अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी आहे.

पाश्चात्य देशांमध्ये ३१ ऑक्टोबर हा दिवस 'हॅलोविन डे' म्हणून साजरा केला जातो. मृत व्यक्ती-आप्तेष्ट यांची आठवण ठेवण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी हॅलोविनची वेषभूषा थीम असलेल्या पार्टीजचे आयोजन केले जाते.

संबंधित बातम्या