यामी गौतमला स्कीन इंफेक्शन

अनेक वर्षापासून यामी या त्वचा रोगाच्या आजाराने त्रस्त आहे.
यामी गौतमला स्कीन इंफेक्शन
Actress Yami Gautam said on social media she has skin infection Instgram/@yamigautam

बोलवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) अलीकडेच तिला झालेल्या त्वचा रोगाबद्दल सोशल मिडियावर सांगितले आहे. केराटोसिस पिलेरिस (Keratosis Pilaros) हा एक त्वचा रोग आहे. अनेक वर्षापासून यामी या त्वचा रोगाच्या आजाराने त्रस्त आहे. यामीने या आजाराबद्दल भीती न बाळगता सामना कसा करावा याबद्दल सोशल मिडियावर (social Media) सांगितले आहे. यामीने सोशल मिडियावर आपले फोटो (Photo) शेअर करून तिच्या त्वचेवर असलेल्या लहान पॅच आणि कोरडेपणाबद्दल सांगितले.

* इन्स्टाग्रामवर केला फोटो शेअर

अलीकडेच यामीने तिच्या अधिकृत सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहे. त्या फोटो खाली तिने लिहिले आहे की, मी नुकतेच एका फोटोशूटसाठी फोटो काढले. तिचे हे फोटो प्रोडक्शनच्या प्रक्रियेसाठी जात होते. त्यामध्ये माझा त्वचा रोग केराटोसिस पिलेरिस दाखवला जात नव्हता. मी स्वता:ला सांगितले की, यामी तू हे सत्य का स्वीकारत नाही? ज्यां लोकांना या गोष्टीबद्दल माहिती नव्हते त्याना सांगते की, हा आजार त्वचेशी संबंधित आहे. यात चेहऱ्यावर लहान पिंपल्स येतात. अनेक वर्षापासून मी या त्वचा आजाराचा सामना करत आहे. शेवटी मी माझ्या मनातील सर्व भीती सोडून देवून मी हे तुमच्यासोबत शेअर करण्याचे धाडस केले.

यामीने बाला, सनम रे, काबिल, विकी डोनर आणि उरी यासारख्या चित्रपाटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच तिचा भूत पॉलिस हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यात यामीसोबत अर्जुन कपूर, सैफ अली खान आणि जॅकलिन फर्नांडिस हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.

Related Stories

No stories found.