अभिनेत्री यामी गौतम अडकली लग्नबेडीत; पहा फोटो

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जून 2021

यामीला तिच्या चाहत्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिध्द अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) अखेर लग्नबेडीत(married) अडकली आहे. सोशल मिडिया पोस्टद्वारे यामीने दिग्दर्शक आदित्य धरशी (Aditya Dhar) लग्न केल्याची माहिती दिली आहे. सोशल मिडियावर यामीने फोटो शेअर करत 4 जून रोजी लग्न केल्याची माहिती दिली आहे. सध्या आदित्य आणि यामीचे लग्नातील फोटो सोशल मिडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होत आहेत. यामीला तिच्या चाहत्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. (Actress Yami Gautam stuck in marriage See photo)

इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन (Instagram) यामीने लग्नातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये यामीने लाल रंगाची साडी परिधान केली असून ती यामध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तर आदित्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. यामीने लग्नातील फोटो शेअर 'कुटुंबीयांचा आशिर्वाद घेऊन आम्ही लग्नाच्या बेडीत अडकलो आहोत. काही जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्न सोहळा पार पडला आहे' अशा आशयाचे कॅप्शन यामीने आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टला दिले आहे.

Birth Anniversary: दोन दशकानंतर 'चेन्नई एक्स्प्रेस' मधून केली होती...

कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यामीने काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले आहे. सध्या यामीच्या लग्नातील फोटो सोशल मिडियावर तूफान व्हायरल होत असून अनेकजण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेता वरुण धवन, कार्तिक आर्यन, वाणी कपूर, जॅकलिन फर्नांडिस, ताहिरा कश्यप अशा अनेक सेलिब्रिटींना यामीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आदित्यने 2019 मध्ये प्रदर्शित केलेला उरी : द सर्जिकल स्ट्राईक (Uri: The Surgical Strike) या चित्रपटात यामीने काम केले होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान कमाई केली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

संबंधित बातम्या