
Abhay Deol Birthday: आज अभय देओलचा 47वा वाढदिवस आहे. अभय देओल या अशा अभिनेत्यापैकी एक आहे, जो कसदार अभिनयानंतरही यशाच्या उच्च शिखरावर पोहचू शकला नाही. अभयचे जिंगदी ना मिलेगी दोबारा, रांझणा आणि चक्रव्यूह हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.
अभय देओल उत्तम अभिनेता तर आहेच मात्र अनेकदा तो त्याच्या अभिनयामुळे नाही तर वक्तव्यामुळे चर्चेत राहतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याची काही चर्चेतील वक्तव्ये कोणती आहेत.
डायरेक्टरने सर्वासमोर केला अपमान
जवळजवळ वर्षभरापूर्वी एका मुलाखतीत अभय देवोलने बॉलीवूड इंडस्ट्रीविषयी काही गोष्टी शेअर केल्या आहेत. त्याने म्हटले होते जेव्हा तुम्ही तुमच्या मनातले बोलता तेव्हा लोक तुम्हाला तुम्ही चुकीचे आहात असे भासवून देतात.
तुम्ही स्वत:वर शंका घ्यावी असे वागतात. एका फिल्ममेकरने माझा सर्वासमोर अपमान केला होता. माझ्या कानाखाली मारले होते. माझ्याविषयी खोट्या अफवा पसरवल्या होत्या.
दारुचे व्यसन
देव डी ही अभयच्या हिट फिल्मपैकी एक आहे. या फिल्मनंतर अभयला दारुचे व्यसन लागले होते. त्याने दिलेल्या म्हटल्यानुसार तो या व्यसनातून वर्षभर बाहेर पडू शकला नव्हता.
इंडस्ट्रीमध्ये फीट नाही
अभयने म्हटले आहे की मी या इंडस्ट्रीमध्ये फीट नाही होत. एका मुलाखतीत म्हटले होते की मला वाटते मी या इंडस्ट्रीमध्ये मिसफीट आहे. इथे गटबाजी चालते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे.
स्टार्सना सुनावले
अमेरिकेत जेव्हा जॉर्ज फ्लॉएडच्या मृत्यूनंतर जेव्हा ब्लॅक लिव्ह्स मॅटर हे आंदोलन सुरु झाले होते.
या आंदोलनावेळी बॉलीवूडच्या अनेकांनी याला आपला पाठिंबा दर्शवला होता. तेव्हा त्यांच्यावर निशाना साधताना जे आपल्याच देशात रंगभेदाला महत्व देताना फेअरनेस क्रीमला प्रमोट करतात असे म्हटले होते.
अभय दओल त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत राहत असला किंवा त्याची वक्तव्ये चर्चेत राहत असली तरी तो जे बोलेल मनापासून बोलत असल्याने त्याचा म्हणून एक मोठा चाहता वर्ग आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.