न्यायालयाने फेटाळली Armaan Kohli ची जामीन याचिका

अभिनेता अरमान कोहली याला अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.
न्यायालयाने फेटाळली  Armaan Kohli ची  जामीन याचिका
Court rejects Armaan Kohli's bail pleaDainik Gomantak

अभिनेता अरमान कोहली (Armaan Kohli) याला अमली पदार्थ (drugs) बाळगल्या प्रकरणी पोलिसांकडून अटक (arrested) करण्यात आली होती. दरम्यान अरमान कोहली याने जामिनासाठी कोर्टाकडे अर्ज केला असता, शनिवारी, मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने (Additional chief metropolitan magistrate court) ही जामीन याचिका फेटाळली आहे.

Court rejects Armaan Kohli's bail plea
RRSची तुलना तालिबानशी करत जावेद अख्तर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात!

अरमान कोहलीला बुधवारी ड्रग्स प्रकरणात एनसीबी (NCB) कोठडी संपल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, त्यानंतर त्याने कोर्टापुढे जामीन अर्ज केला. अरमान कोहलीला बुधवारी (1 सप्टेंबर) त्याच्या एनसीबी (NCB) कोठडीच्या शेवटी न्यायालयात हजर करण्यात आले. एनसीबीने कोठडीमध्ये वाढ केली नसल्याने एसीएमएम (MCMM) न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

Court rejects Armaan Kohli's bail plea
रानू मंडलच्या बायोपिकमध्ये 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करणार काम

या कलम अंतर्गत गुन्हा दाखल

याआधी, एनसीबीने न्यायालयाला सांगितले की, अरमान कोहली यांच्या घरी टाकलेल्या एका छाप्यादरम्यान त्याच्या घरातून एक ग्रॅमपेक्षा जास्त कोकेन जप्त केले आहे. आणि अरमानकोहलीचे आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटशी संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आमच्या कडे आहेत. एनसीबीने 28 ऑगस्ट रोजी अरमान कोहलीला अटक केली कारण त्याच्या घरातून अमली पदार्थांचा साठा मिळाला होता या नंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली होती, त्याच्यावर एनडीपीएस (मादक द्रव्ये आणि सायकोट्रॉपिक पदार्थ) कायद्याच्या कलम (21 (अ), 27 (अ), 28, 29, 30, आणि 35) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com