Rakhi Sawant-Adil Khan : "आम्ही दोघं सध्या"... राखी सावंतसोबतच्या लग्नावर आदिल खान दुर्राणी म्हणाले...

गेले काही दिवस आदिल खान दुर्राणी आणि राखी सावंत यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Rakhi Sawant 
Adil Khan-Durrani
Rakhi Sawant Adil Khan-Durrani Dainik Gomantak

कॉन्ट्रावर्सी क्वीन राखी सावंत आणि म्हैसुरचे उद्योगपती आदिल खान-दुर्राणी यांचं लग्न झाल्याची बातमी समोर आली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. सुरूवातीला या गोष्टीवर नेहमीप्रमाणे राखीने न थकता प्रतिक्रिया दिल्या आणि लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत.

सुरूवातीला या गोष्टीवर काही प्रतिक्रिया द्यायला आदिल खान दुर्राणी तयार नव्हते पण त्यामुळे हे लग्न झालंय की नाही कि हा सुद्धा राखीचा नेहमीसारखाच काही ड्रामा आहे असं वाटत होतं.

राखी सावंतने 'मराठी बिग बॉस 4' मध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री केली आणि बाहेर पडताच लोकांना एक मोठा धक्का दिला. राखीने सर्वप्रथम आपल्या आईच्या आजाराविषयी माहिती दिली आणि आणि लोकांना आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. यानंतर राखीने एक मोठा धक्का दिला. राखीने उद्योगपती आदिलसोबतच्या लग्नाचा खुलासा केला. 

पण राखीने पुढं असंही सांगितलं की आदिल खान तिला स्वीकारत नाही. मी लग्नानंतर नाव बदललं असंही राखीने सांगितले.  इतकेच नाही तर आदिलने लग्न लपवण्यासाठी जबरदस्ती केल्याचंही राखीनं सांगितलं होतं. या सगळ्यावर आता आदिलची प्रतिक्रिया आली आहे. त्यानं आता मौन भंग केले आहे.

राखीच्या मते आदिल खान तिला स्वीकारत नाही यावर आदिल खान आता थेट बोलला आहे. आदिल खान यांना जेव्हा याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी बोलण्यासाठी 10 दिवस द्या असं सांगितलं होतं. आता मात्र आदिल खान-दुर्राणी यांनी याबाबत स्पष्टच सांगितलं आहे. ते म्हणाले "होय, माझं आणि राखीचे लग्न झाले आहे". 

आम्ही दोघे एकत्र राहतो आणि आनंदी आहोत. त्याच्या बोलण्यातून असे जाणवलं की त्याचे लग्न अजून जाहीर करायचे नाही कारण त्याचे कुटुंब अजून तयार नाही.

Rakhi Sawant 
Adil Khan-Durrani
Katrina Kaif Got Angry: कॅमेरा खाली घ्या नाही तर... कॅटरिना कैफची पापाराझींना धमकी

सुरूवातीला जेव्हा राखीने याबाबतीत खुलासा केला तेव्हा या लग्नावर 'लव्ह जिहाद' प्रकरणाचे सावट आहे की काय असं वाटत होतं.

त्याचं कारण राखीने स्वत:चं नाव बदलण्याविषयी आणि तिच्यावर दबाव असण्यासंदर्भात सांगितले होते. पण आता आदिल खान दुर्राणी यांनीच या गोष्टीला स्वीकारल्यामुळे गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com