Adipurush: दिपिका पादुकोणच्या एक्झीटमुळे क्रिती सेननची प्रभाससोबत एंट्री

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

प्रभास आणि सैफ अली खान यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये क्रिती सेननची ही एंट्री झाली आहे. त्याचबरोबर सनी सिंग देखील क्रिती सोबत या चित्रपटात सामील झाला आहे.

मुंबई: प्रभास आणि सैफ अली खान यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये क्रिती सेननची ही एंट्री झाली आहे. त्याचबरोबर सनी सिंग देखील क्रिती सोबत या चित्रपटात सामील झाला आहे. क्रितीने सोशल मीडियावर चाहत्यांना ही चांगली बातमी दिली आहे. क्रिती आणि सनीचा हा एक मोठा चित्रपट आहे. या चित्रपटात सामील झाल्याने दोघेही खूप उत्सुक आहेत. क्रितीने सनी, प्रभास आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

यावेळी प्रभास, क्रिती आणि सनी पारंपारिक लूकमध्ये दिसले आहेत क्रिती आणि सनीच्या चेहऱ्यावर चित्रपटाबद्दलचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे. 'एका नव्या प्रवासाची सुरुवात… आदिपुरुष. हा चित्रपट खूप खास आहे. या जादुई जगाशी कनेक्ट झाल्याने मला  खूप अभिमान आणि उत्साह वाटत आहे, असे फोटो शेअर करताना क्रितीने लिहिले आहे.

ही बातमी येण्यापूर्वी दीपिका पादुकोण या चित्रपटाचा एक भाग होणार होती. चित्रपटाच्या दिग्दर्शकाची पहिली पसंती दीपिका पादुकोण होती, पण नंतर असे सांगितले जात होते की दीपिका आणि प्रभासने नाग अश्विनच्या चित्रपटाला आधीपासूनच साइन केले होते. अशा परिस्थितीत दोघांनाही बॅक-टू-बॅक एकत्र चित्रपटात यायचे नाही. दीपिकाने हा चित्रपट सोडल्यामुळे क्रितीला मोठा फायदा झाला. आता क्रिती या मोठ्या चित्रपटाचा एक भाग आहे. प्रभास आणि सैफसोबत क्रितीचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Roohi Box Office Review: रुही ने तोडले टेनेट आणि वंडर वुमन 84 चे रेकॉर्ड पहिल्याच दिवशी केली करोडोंची कमाई 

काही दिवसांपूर्वी आदिपुरुषच्या सेटवर आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि संपूर्ण क्रोमा सेट जळून खाक झाला होता. निर्मात्यांना या दुर्घटणेमुळे मोठा तोटा सहन करावा लागला.

 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kriti (@kritisanon)

संबंधित बातम्या