Pathaan Tickets: शाहरूखच्या 'फॅन'साठी खूशखबर, 'पठाण'च्या तिकीट दरात मोठी कपात

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
Pathaan Movie
Pathaan MovieDainik Gomantak

शाहरुख खान (Shah Rukh Khan), जॉन अब्राहम (John Abraham) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर पठाण चित्रपट 25 जानेवारीला रिलीज झाला. रिलीज झाल्यापासून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई केली आहे. पाच दिवसांत या चित्रपटाने जगभरात 500 कोटी रूपयांची कमाई केली आहे.

दरम्यान, शाहरूख खानच्या फॅनसाठी मोठी बातमी समोर आली असून, पठानच्या तिकीट दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटाच्या तिकीट दरात 25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

(Aditya Chopra Decides To Cut Down Ticket Prices of Film Pathaan By 25%)

Pathaan Movie
Pathaan Viral Video: पॅरिसमध्येही ‘पठाण’चा डंका; फॅन्सचा थिएटरमध्येच जल्लोष! पाहा व्हिडिओ

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगसह चित्रपटाची तिकिटे हजारो रुपयांना विकली जात आहेत. अशात चित्रपटाच्या तिकीट दरात 25 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत.

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवण्यासाठी पठाणच्या तिकीट दरात 25 टक्के कपात करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

निर्माता आदित्य चोप्राने पाच दिवसांच्या कमाईनंतर तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सहसा, निर्माते चित्रपटाच्या रिलीजच्या दुस-या आठवड्यात किंमती कमी करतात, परंतु आदित्य चोप्राने ते पाच दिवसांच्या आत तिकीट दर कमी केले आहेत.

Pathaan Movie
Pathan Box Office Collection: 6 दिवसांत 600 कोटी कमवण्यापासून 'पठाण' थोडक्यात हुकला...

तिकिटाचे दर कमी केल्यानेच चित्रपटाला यश मिळण्यास अजून मदत होईल. चित्रपट 600 कोटी क्लबमध्ये पोहोचल्यानंतर पठान येत्या एका आठवड्यात 1,000 कोटींची कमाई करेल अशी शक्यता आहे. असे मत चित्रपट जाणकारांनी व्यक्त केले आहे.

अनेक देशांमध्ये हा चित्रपट अवतार-2 आणि मार्वलच्या कमाईलाही मागे टाकणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने भारतात बाहुबली, केजीएफ आणि आरआरआरला टक्कर देत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com