Adnan Sami On Indian Citizenship:"मी पाकिस्तानचे नागरीकत्व सोडून भारताचे स्वीकारले कारण...अदनान सामी ट्रोलर्सवर भडकला....

गायक अदनान सामीने पाकिस्तानी नागरीकत्वाचा त्याग करून भारतीय नागरीकत्व स्वीकारले आहे.
Adnan Sami
Adnan Sami Dainik Gomantak

मुझको भी लिफ्ट करादे असं म्हणत बॉलिवूडला एक वेगळं संगीत देणाऱ्या गायक, संगीतकार अदनान सामीला भारतात वेगळ्या ओळखीची गरज नाही. अदनान सामीन आशा भोसले, शंकर एहसान लॉय यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम केले आहे. मध्यंतरी वजन कमी केल्यानंतर आपल्या नव्या लूकमुळे चर्चेत असणारा हा गायक सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

प्रसिद्ध बॉलीवूड गायक अदनान सामी याला पाकिस्तानचे नागरिकत्व सोडून भारताचे नागरिकत्व स्वीकारल्याबद्दल खूप टीकेला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानच्या लोकांनी त्याच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पैशासाठी हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले होते.

जेव्हा अदनानने भारताचे नागरिकत्व घेतले तेव्हा अनेकांनी त्याच्यावर आरोप केले की, त्याने हे पैशासाठी केले. आता अदनानने आपल्यावरील या आरोपांबाबत उघडपणे बोलला आहे. 

एका मुलाखतीत संवाद साधताना अदनान म्हणाला, 'पाकिस्तानातील काही लोक म्हणू लागले की अरे त्यांनी भारताला निवडले कारण त्यांना तेथे जास्त पैसे मिळतात. 

मी म्हणालो - माफ करा, तुम्हाला माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीची कल्पना आहे का? माझ्या आयुष्यात पैसा हा इतका महत्त्वाचा घटक कधीच नव्हता हे तुम्हाला माहीत आहे का? मला देवाच्या आशिर्वादाने एका अत्यंत संपन्न कुटुंबात जन्म मिळाला.

 माझ्याकडे कधीच पैशाची कमतरता नव्हती आणि जर फक्त पैशाची बाब असती तर मी जे काही तिथे म्हणजे पाकिस्तानात सोडले नसते.

Adnan Sami
Pariniti Chopada - Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि खा. राघव चढ्ढा एकमेकांना डेट करतायत? मुंबईत दिसले एकत्र...

भारतावर प्रेम करणाऱ्या लोकांना एवढी छोटी गोष्ट समजणे इतके अवघड का आहे, असा प्रश्न अदनानला पडला. इथे त्याला आपलं घर वाटतं आणि याच कारणामुळे त्याने इथलं नागरिकत्व घेतलं असं अदनानचं मत आहे. एक कलाकार म्हणून इथे मिळणारे प्रेम आणि कौतुक मला आवडते, असे तो म्हणाला.

दोन्ही देशांमध्ये ज्या प्रकारचे राजकीय वातावरण आहे, त्यामुळे स्वत:साठी येथील नागरिकत्व मिळणे त्यांच्यासाठी खूप कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, आपण संगीतकार असल्याने आपला राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com