करण जोहर नंतर साजिद नाडियाडवाला सोबत कार्तिक आर्यन करणार काम

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 मे 2021

प्यार का पंचनामा, सोनू की टिटू की स्वीटी, पती पत्नी और वो अशा काही चित्रपटांमध्ये कॉमेडी व रोमँटिक भूमिका साकारणारा अभिनेता कार्तिक आर्यन सध्या खूप चर्चेत आहे.

मुंबई: प्यार का पंचनामा, सोनू की टिटू की स्वीटी, पती पत्नी और वो अशा काही चित्रपटांमध्ये कॉमेडी व रोमँटिक भूमिका साकारणारा अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aryan) सध्या खूप चर्चेत आहे. करण जोहरशी( Karan Johar ) ‘दोस्ताना २’ या चित्रपटामुळे अनबन झाल्यामुळे त्याच्याबद्दल उलटसुलट बातम्या येत आहेत, परंतु कार्तिक आर्यन आता निर्माता साजिद नाडियादवाला(Sajid Nadiadwala) आणि नम पिक्चर्स यांच्याबरोबर एक चित्रपट करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (After Karan Johar Kartik Aryan will be work with  Sajid Nadiadwala) 

कार्तिक पहिल्यांदाच साजिदबरोबर काम करणार

या चित्रपटामध्ये वेगळी अशी लव्हस्टोरी असणार आहे आणि कार्तिक या चित्रपटात लव्हबॉयची भूमिका साकारणार असल्याचे समजते. या चित्रपटाचे शूटिंग या वर्षाच्या शेवटी सुरू होण्याची शक्यता आहे. गेले काही महिने साजिद नाडियादवाला कार्तिकबरोबर काम करण्यास उत्सुक होते; परंतु त्यांना हवी तशी स्क्रीप्ट मिळत नव्हती. आता ती मिळाल्यानंतर कार्तिक आणि त्यांच्यामध्ये बोलणेही झाले. कार्तिक पहिल्यांदाच साजिदबरोबर काम करणार आहे. चित्रपटाची नायिका कोण असेल हे अद्याप ठरवलेले नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर या चित्रपटाचे नाव घोषित करण्यात येणार असल्याचे समजते आहे.

Allu Arjun: 15 दिवसांनंतर मुलांना भेटताच झाला भावूक; पाहा व्हिडिओ 

चित्रपटात कार्तिक आर्यनची वेगळी शैली पाहायला मिळणार 
असे सांगण्यात आले आहे की साजिद नाडियाडवाला काही काळ कार्तिकबरोबर चित्रपटाची योजना करत होते. तो एक कथा शोधत होता ज्यात कार्तिक आर्यन फिट बसला. त्यांची चॉकलेट इमेज लक्षात घेत एक रोमँटिक लव्ह स्टोरी साजिद ला क्रियेट करायची आहे. कार्तिक अशा भूमिकेत दिसणार आहे की, त्याला यापूर्वी पडद्यावर तसे कोणी पाहीले नसणार.

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेची टीम मुंबईत परतली

राष्ट्रीय पुरस्कार विजेता समीर डेमनेशन
साजिद नाडियाडवालाचा चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शन टप्प्यावर आहे. चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक समीर विध्वंस काही काळ रोमँटिक चित्रपटांत नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येण्याचा विचार करत आहेत. गेल्या वर्षी साजिद नाडियाडवालाचा चित्रपट 'छिछोरे' (बेस्ट फीचर फिल्म) आणि समीर विध्वंन्सचा 'आनंदी गोपाळ' (सोशल इश्यूवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट) या दोघांनाही दोन्ही राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
 

संबंधित बातम्या