राधेनंतर आता सैफ अली खानचा 'भूत पोलिस' ओटीटीवर?

दैनिक गोमंतक
गुरुवार, 20 मे 2021

भूत पोलिसमध्ये सैफ अली खानसमवेत अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

साल 2020 पासून पसरलेल्या कोरोनाच्या साथीने (Coronavirus) संपूर्ण देशाचे नुकसान झाले आहे. यामध्ये चित्रपटसृष्टीचेही भरपूर नुकसान झाले आहे. गेल्या वर्षभरापासून असे बरेच चित्रपट आले. अनेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीजसाठी अडकले आहेत. तथापी, परिस्थिती पाहता बर्‍याच निर्मात्यांनी आपले चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले आहेत. अलीकडेच सलमान खानचा (Salman Khan) बिग बजेट चित्रपट 'राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई' (Radhe- Your Most Wanted Bhai) चित्रपटदेखील झीप्लेक्सवर प्रदर्शित झाला आहे. त्याचवेळी ओटीटीवर आणखी एक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची बातमी समोर येत आहे. (After Radhe, now Saif Ali Khan's bhoot police on OTT)

#Happy Birthday Junior NTR ट्रेंड झाला व्हायरल, चाहत्यापासून ते कलाकारांपर्यंत...

माध्यमाच्या वृत्तानुसार सैफ अली खान (Saif Ali Khan), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), जॅकलिन फर्नांडिज (Jacqueline Fernandez), यामी गौतम (Yami Gautam) यांची मल्टीस्टार असलेला चित्रपट 'भूत पोलिस' चित्रपटगृहात रिलीज न करता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. बातमीनुसार हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होऊ शकतो. सध्या दोन्ही पक्षांत पेपर वर्क आणि चर्चा सुरू आहे. वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा कोरोनाची परिस्थिती सुधारत होती आणि चित्रपटगृहे सुरू झाली तेव्हा निर्मात्यांनी थिएटरमध्ये काही चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली. ज्यामध्ये भूत पोलिसचा देखील समावेश होता. हा चित्रपट 10 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता, पण कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, आता हा चित्रपट ओटीटीवर लाँच करण्याची योजना तयार केली जात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

 

भूत पोलिसमध्ये सैफ अली खानसमवेत अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. भूत पोलीस पवन कृपलानी दिग्दर्शित एक भयानक विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती रमेश तोरानी आणि आकाश पुरी यांनी केली आहे. भूत पोलिसची शूटिंग हिमाचल प्रदेशात मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाली होती आणि त्यानंतर फक्त 3 महिन्यांनंतर 5 फेब्रुवारी 2021 रोजी ते पूर्ण झाले. गो गोवा गोन नंतर सैफचा हा दुसरा हॉरर विनोदी चित्रपट आहे, तर अर्जुन कपूर पहिल्यांदा या शैलीत दिसणार आहेत.

 

संबंधित बातम्या