Natu Natu Song: ऑस्कर मिळाल्यानंतर एमएम कीरावानी भाषणात म्हणाले, हे संभव होणे...

Natu Natu Song: 2009 मध्ये ए.आर. रहमानच्या स्लमडॉग मिलेनियरनं सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या कॅटॅगिरीत ऑस्कर जिंकला होता.
M.M. Kirawani
M.M. KirawaniDainik Gomantak

Natu Natu Song: आरआऱआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याने सर्वोकृष्ट मूळ गाण्याच्या कॅटॅगरीत ऑस्कर मिळवून इतिहास घडला होता. याआधी 2009 मध्ये ए.आर. रहमानच्या स्लमडॉग मिलेनियरनं सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या कॅटॅगिरीत ऑस्कर जिंकला होता.

आता स्लमडॉग मिलेनियरनंच्या नंतर नाटू नाटूने ऑस्कर जिंकून इतिहास रचला आहे. म्युजिक कंपोजर एमएम कीरावानी ऑस्कर पुरस्कार घेताना भाषण दिले आहे.

नाटू नाटूला ऑस्कर पुरस्कार मिळणे संभव होण्यासाठी धन्यवाद! सर्वांच्या सहकार्याने हे शक्य होऊ शकले आहे. असे म्हणत एमएम कीरावानींनी गाण्यासाठी कष्ट घेतलेल्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. पुरस्कार घेताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, अमेरिकेत पार पडलेल्या 95 व्या ऑस्कर सोहळ्यात दिपिका पदुकोन देखील हजेरी लावली होती.

आरआऱआर चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. नाटू नाटू ने गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर पुरस्कार स्विकारताना एमएम कीरावानी भावूक झाले होते.

भारताने दोन ऑस्कर पुरस्कार आपल्या नावावर करणे ही भारतासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. जगभरातून आरआरआर आणि 'द एलिफंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com