सुशांतच्या मृत्यूनंतर रिया या अभिनेत्यासोबत गेली पार्टीला

दैनिक गोमंतक
रविवार, 11 एप्रिल 2021

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानं संपूर्ण देशात थैमान घातलं. सुशांत प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये पडद्याआड घडणाऱ्या अनेक गोष्टी समोर आल्या होत्या.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानं संपूर्ण देशात थैमान घातलं. सुशांत प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये पडद्याआड घडणाऱ्या अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. सुशांत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला तुरूंगवास देखील झाला. या सर्व प्रकरणामुळे ती बॉलिवूड विश्वात चर्चेचा विषय ठरली होती. आता नुकतीच रिया आणखी एका कारणामुळे चर्चेचा विषय बनली आहे. आता नुकतीच ती कूल अंदाजात गेटवे ऑफ इंडियाला स्पॉट झाली. यादरम्यानचे रियाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. नुकतीच रिया चक्रवर्ती साकिब सलीम आणि मनीष मल्होत्रासोबत गेटवे ऑफ इंडियाला स्पॉट झाली. असे सांगितले जात आहे की हे कलाकार साकिब सलीमच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी भेटले होते. ही पार्टी अलिबागला झाली होती.(After Sushant's death, Riya went to a party with the actor)

इरफान खान यांच्या मुलाचे सिनेसृष्टीत पदार्पण

दोघेही अलिबागहून पार्टी करून येत होते. यादरम्यान हे दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसले. रिया एकदम कूल अंदाजात दिसली. रिया आणि साकिब दोघेही मीडियासमोर उभे राहिले नाहीत आणि तेथून थेट निघून गेले. असे म्हटले जात आहे की, रियाने साकीबचा वाढदिवस अलिबागमध्ये साजरा केला आहे आणि यावेळी मनीष मल्होत्रा ​​देखील त्यांच्यासोबत होता. सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर अनेक गंभीर आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 ला त्याच्या राहत्या घरी आत्महत्या आणि देशात काहूर उठला. मात्र त्याची आत्महत्या नसून हत्या असल्याचं त्याच्या फॅन्स आणि घरच्यांचं  म्हणणं होतं. विशेष म्हणजे ही हत्या त्याची प्रेयसी बाॅलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केल्याचा आरोप तिच्यावर केला गेला होता. तसेच ड्रग्सप्रकरणी रियाला अटक देखील करण्यात आली होती.

प्रियांका जाहीर करणार बाफ्टा इंटरनॅशनल अवॉर्ड 

दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर आता रिया 'चेहरे' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरमधून रियाला दूर ठेवण्यात आले होते. मात्र, रिया या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसली होती. तिला मोठ्या पडद्यावर पाहून रियाचे चाहते देखील उत्साही झाले आहेत.

 

संबंधित बातम्या