'तांडव' नंतर आता 'मिर्जापूर' वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात    

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

अ‍ॅमेझॉन प्राइमची वेब सिरीज 'तांडव' बद्दल सुरु असलेला वाद अजून थांबलेला नसताना आता आणखीन एका वेब सिरीज वरून नवा वाद सुरु झाला आहे.  

अ‍ॅमेझॉन प्राइमची वेब सिरीज 'तांडव' बद्दल सुरु असलेला वाद अजून थांबलेला नसताना आता आणखीन एका वेब सिरीज वरून नवा वाद सुरु झाला आहे.  'तांडव' नंतर आता चांगलीच गाजत असलेली वेब सिरीज 'मिर्जापूर' वरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे. उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर जिल्ह्याची प्रतिमा खराब झाल्याच्या आरोपावरून निर्मात्यांना आणि अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओला सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. 'मिर्जापूर' या वेब सिरीजमुळे मिर्जापूर जिल्ह्याची प्रतिमा खराब झाल्याचे आरोप करत एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. व याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

'मिर्जापूर' या वेब सिरीजचा पहिला भाग 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर या सिरीजचा दुसरा भाग ऑक्टोबर 2020 मध्ये रिलीज झाला होता. याशिवाय 'मिर्जापूर' या वेब सीरिजची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी केली आहे. व ही वेब सिरीज क्राईम ड्रामा असून, यातील स्टोरी पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात दाखवली गेली आहे. त्यामुळे या सिरीजच्या माध्यमातून उत्तर प्रदेश मधील मिर्जापूर जिल्ह्याचे नाव खराब होत असल्याची तक्रार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. व या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने निर्मात्यांना नोटीस पाठवत उत्तर मागितले आहे. 

दरम्यान, यापूर्वी 'मिर्जापूर' वेब सिरीजच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याच्या आणि जिल्ह्याची प्रतिमा खराब केल्याच्या आरोपाखाली रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि भौमिक गोंडालिया यांच्याविरुद्ध मिर्जापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली होती.     

संबंधित बातम्या