37 व्या वर्षी श्रेया बनली आई; बॉलिवूडच्या या अभिनेत्रींना लग्नानंतर अनेक वर्षांनी मातृत्व

दैनिक गोमंतक
रविवार, 23 मे 2021

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 2009 मध्ये उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले. वयाच्या 38 व्या वर्षी अभिनेत्री पहिल्यांदा आई झाली.

बॉलिवूडची (Bollywood) सगळ्यांची आवडती गायिका श्रेया घोषाल नुकतीच आई बनली आहे. वयाच्या 37 व्या वर्षी तिने मुलाला जन्म दिला आहे.  श्रेया घोषालने (Shreya Ghoshal) प्रियकर शिलादित्य मुखोपाध्याय याच्याशी 5 फेब्रुवारी 2015 रोजी लग्न केले, त्यानंतर 6 वर्षानंतर ती आई झाली आहे. श्रेया घोषालच्या अगोदरही बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री लग्नानंतर अनेक वर्षांनी आई झाल्या आहेत. चला तर मग त्या अभिनेत्री कोण आहेत पाहुयात. (At the age of 37, Shreya Ghoshal became a mothe)

कलाकारांच्या फोटो पोस्टवरती अन्नू कपूर भडकले

ऐश्वर्या राय बच्चन
बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan), वयाच्या 34 व्या वर्षी अभिनेता अभिषेक बच्चनशी तिने लग्न केले. लग्नाच्या 4 वर्षानंतर अभिनेत्रीने मुलगी आराध्याला जन्म दिला. अभिनेत्रीने मातृत्वाचा आनंद घेण्यासाठी तिच्या बॉलिवूड कारकिर्दीपासून ब्रेक घेतला. पण मुलगी मोठी झाल्यानंतर आता ऐश्वर्या राय पुन्हा चित्रपटांकडे वळली आहे.

माधुरी दीक्षित
धक-धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) वयाच्या 37 व्या वर्षी पहिल्यांदा आई बनली. माधुरी दिक्षितचा दुसरा मुलगा तिला वयाच्या 39 व्या वर्षी झाला होता. माधुरीने  इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांना नाकारले आणि डॉक्टर नेनेंशी लग्न केले. देवदास चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान माधुरी दिक्षित प्रेग्नेंट होती. माधुरी लवकरच नेटफ्लिक्सच्या फाइंडिंग अनामिका या चित्रपटात दिसणार आहे.

राणी मुखर्जी
लोकप्रिय अभिनेत्री राणी मुखर्जीने (Rani Mukerji)  वयाच्या 38 व्या वर्षी मुलीला जन्म दिला. अभिनेत्रीने 2014 मध्ये आदित्य चोप्राशी लग्न केले. राणी मुखर्जी आपल्या मुलीचे अत्यंत चांगल्या प्रकारे संरक्षण करते बर्‍याचदा तिला मीडियाच्या नजरेपासून दूर ठेवते.

Fitness Video: पाहा मंदिरा बेदीचा "हँडस्टँड" करतांनाचा व्हीडीओ

करीना कपूर खान
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने (Kareena Kapoor Khan) २०१२ साली नवाबजादे सैफ अली खानशी लग्न केले . त्यांच्या लग्नाच्या चार वर्षानंतर अभिनेत्रीने पहिला मुलगा तैमूरला जन्म दिला. त्यावेळी करीना 36 वर्षांची होती. चार वर्षांनंतर 2021 मध्ये, करिना 40 वर्षांची झाली तेव्हा ती दुसऱ्यांदा आई बनली. अभिनेत्रीने सध्या तिच्या दुसर्‍या मुलाची संपूर्ण झलक अजूनही शेअर केलेली नाही.

शिल्पा शेट्टी
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 2009 मध्ये उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले. वयाच्या 38 व्या वर्षी अभिनेत्री पहिल्यांदा आई झाली. त्यांनी व्हियान नावाच्या मुलाला जन्म दिला. आता वयाच्या 44 व्या वर्षी शिल्पाने सरोगेसीच्या माध्यमातून दुसऱ्यांदा आई बनली आहे. तिच्या मुलीचे नाव शमीषा आहे.

फराह खान
लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक फराह खान वयाच्या 43 व्या वर्षी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून आई बनली. या अभिनेत्रीचे तीन मुलं आहेत ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ वारंवार सोशल मीडिया अकाउंटवरून फराह खान पोस्ट करत असते. फराह खान ने 2004 मध्ये शिरीष कुंदरशी लग्न केले होते.

नेहा धुपिया
नेहा धुपिया ने 2018 मध्ये अंगद बेदीशी लग्न केले. लग्नानंतर काही महिन्यानंतरच या अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला. त्यावेळी अभिनेत्री 37 वर्षांची होती. नेहा आणि अंगद यांच्या मुलीचे नाव मेहेर आहे.

 

संबंधित बातम्या