अग्गोबाई आजीबाई : मालवणी आजींची बबड्याच्या नावे शिव्यांची लाखोली

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

मराठीवरील प्रसिद्ध मालिका अग्गबाई सासूबाई सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील बबड्या हे पात्र सगळ्यांनाच ओळखीच आहे. पण सध्या बबड्या हे पात्र एका आजींना फारच खूपतंय. वेगुर्ले येथिल हि मालवणी आजी असून या आजींचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झालाय.

वेंगुर्ले : मराठीवरील प्रसिद्ध मालिका अग्गबाई सासूबाई सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील बबड्या हे पात्र सगळ्यांनाच ओळखीच आहे. पण सध्या बबड्या हे पात्र एका आजींना फारच खूपतंय. वेगुर्ले येथिल हि मालवणी आजी असून या आजींचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झालाय. त्यामध्ये या आजी मालवणीतून  भाषेतून बबड्याला  शाब्दिक फटके देताना दिसल्यात. या निरागस आजीबाईंचा हा व्हिडीओ सध्या तुफाज गाजतोय.

अग्गबाई सासूबाई या मालिकेतील बबड्या हे पात्र नकारात्मक भूमिकेत आहे. या काल्पनिक पात्राचा आजीबाईंनी खरपूस समाचार घेतलाय." "बबड्या डँबिस हा, घरातून चालता हो म्हणावं" असं सुनावणाऱ्या वेंगुर्ल्यातील आजीबाईंची चर्चा सध्या जोरात आहेत. अग्गबाई सासूबाई ही मालिका अल्पावधितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.  आणि मालिकेतील कलाकार देखिल प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यानंतर रसिक प्रेक्षकांनी या मालिकेतील पात्रांवर गॉसिपींग करण्यासही सुरुवात केली आहे. मालिकेत घडणाऱ्या काल्पनिक घटना बघून वेंगुर्ल्यातील या आजीला काय वाटल की त्यांनी बबड्या वर शाब्दिक फटके ओढले आहे. "तो काही कामाचा नाही, बबडो नालायक असा" अस पण त्या बोलल्या आहे;  पण याच आजी बबड्याबद्दल बोलताना किती इनोसंट वाटत आहे. तेव्हा या आजीला बघण्यासाठी तुम्हाता हा व्हिडीओ बघावा लागेल....

संबंधित बातम्या