ऐश्वर्या - ह्रतिकच्या जोधा अकबरला तेरा वर्ष पूर्ण

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

जोधा अकबर चित्रपट  2008 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नुकतीच या चित्रपटाला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत.

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द चित्रपटांमध्ये जोधा अकबरचा कायमच समावेश केला जातो. ऐश्वर्या राय बच्च्नन आणि ह्रतिक रोशन यांचा हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर खूप गाजला होता. ऐतिहासिक कथा आणि भव्य सेट असलेला जोधा अकबर चित्रपट 2008 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नुकतीच या चित्रपटाला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने अभिनेता ह्रतिक रोशनने आपल्या इन्साटाग्रामवर एक पोस्ट करत या चित्रपटातील पडद्यामागच्या काही आठवणींना नव्याने उजाळा दिला आहे.

''जोधा अकबर हा चित्रपट करणं अत्यंत कठीण होतं. पहिल्यांदा मला आशुतोष गोवारीकरांनी या चित्रपटाची कल्पना दिली होती. मला त्यावेळी खूप दडपण आले होते. परंतु माझासारखा व्यक्ती ही जबाबदारी योग्यरित्य़ा पार पाडेल असा त्यांना माझ्यावर विश्वास होता. 10 हजार शूर सैन्य संभाळणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेसाठी त्यांनी माझी निवड केली होती. मात्र एखाद्या व्यक्तीची निवड करण्याचे कसब दिग्दर्शकाकडे असतं त्यामुळे मी देखील  या चित्रपटासाठी होकार दिला,’’ असं ह्रतिक यावेळी म्हणाला.

सिनेसृष्टी हादरली; आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या   

तसेच तो पुढेही म्हणाला, ''मला या चित्रपटात कथेपेक्षा ही भूमिका साकारण्यात जास्त रस होता. तो माझ्यासाठी एक नवा अनुभव होता. त्यामुळे ही भूमिका करायची होती. त्याचबरोबर मला या भूमिकेमधून खूप काही शिकता आले.'' जोधा अकबर चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. सध्या अभिनेता ह्रतिक रोशन त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. तो लवकरच 'फायटर' या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या