ऐश्वर्या राय बच्चन ईडीच्या दिल्ली कार्यालयात हजर!

मनी लाँडरिंग (Money laundering) प्रतिबंधक कायदा, 2002 (पीएमएलए) अंतर्गत मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Aishwarya Rai Bachchan

Aishwarya Rai Bachchan

Dainik Gomantak 

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या दिल्ली कार्यालयात हजर झाली. ऐश्वर्या दुपारी दीड वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचली असून तिची चौकशी सुरु आहे. परदेशात संपत्ती जमा केल्याच्या आरोपावरुन तपास एजन्सीने दिल्लीतील 48 वर्षीय अभिनेत्रीचे जबाब नोंदवल्याचे सूत्रांनी सांगितले. मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची सून आणि अभिषेक बच्चनची (Abhishek Bachchan) पत्नी ऐश्वर्या यांना काही वेळापूर्वी समन्स बजावण्यात आले होते परंतु त्यांनी हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता.

<div class="paragraphs"><p>Aishwarya Rai Bachchan</p></div>
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा फेक फोटो होतोय व्हायरल

हे प्रकरण वॉशिंग्टनस्थित इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स (ICIJ) ने पनामा पेपर्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या पनामाच्या लॉ फर्म मॉसॅक फोन्सेकाच्या रेकॉर्डमध्ये 2016 च्या तपासाशी संबंधित आहे. यामध्ये अनेक जागतिक नेत्यांची आणि सेलिब्रिटींची नावे समोर आली ज्यांनी देशाबाहेरील कंपन्यांमध्ये परदेशात पैसा जमा केला होता. यापैकी काहींची वैध विदेशी खाती असल्याचे सांगितले जाते. या खुलाशात करचुकवेगिरीची प्रकरणे समोर आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com