ऐश्वर्या राॅय 4 वर्षांनंतर दिसणार 'या' चित्रपटामध्ये

Cannes 2022: ऐश्वर्या राॅय बच्चनने कान 2022 मधील सुंदर लुकने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.
aishwarya rai bachchan
aishwarya rai bachchanDainik Gomantak

ऐश्वर्या राॅय बच्चनने 2022 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या लूकने सर्वांना घायाळ केले आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या फोटोंची चर्चा सुरू आहे. बऱ्याच दिवसांनी ऐश्वर्या एका मोठ्या कार्यक्रमात दिसली आहे. तसेच ती बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. शेवटची ऐश्वर्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'फन्ने खान' (Fanney Khan) या चित्रपटात दिसली होती, यामध्ये अनिल कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र तेव्हापासून ती चित्रपटांपासून दूर आहे. आता ऐश्वर्याने कान 2022 मध्ये ती इतके दिवस चित्रपटांपासून का दूर होती यांची चर्चा होत आहे. (aishwarya rai bachchan Cannes 2022)

* तू चित्रपटांपासून का दूर आहेस?

एक मुलाखतीमध्ये ती म्हणाली, "गेली काही वर्षे मि माझ्या कुटुंबासह वेळ घालवत होती. ऐश्वर्या जितकी उत्तम अभिनेत्री आहे तितकीच ती 'आई' देखील आहे. मुलगी आराध्याच्या जन्मापासून ती चित्रपटांसोबतच (Movie) तिची पूर्ण काळजी घेत आहे. इतकेच नाही तर आराध्याच्या जन्मापासून ती पूर्वीपेक्षा चित्रपटांकडे दुर्लक्ष केले आहे. ती आराध्याच्या शिक्षणाची, संगोपनाची पूर्ण काळजी घेते आणि आईची जबाबदारी पार पाडते.

aishwarya rai bachchan
Cannes Film Festival: फ्रान्समध्ये '53 व्या इफ्फी' च्या पोस्टरचे अनावरण

ऐश्वर्या (aishwarya rai bachchan) आता मणिरत्नमच्या 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटात (Movie) दिसणार आहे . आता ऐश्वर्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. यासोबतच, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील हे वेगळे पात्र असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com