Aishwarya Rai Bachchan 'या' फोटोवरुन झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले...

Aishwarya Rai Bachchan Trolled: ऐश्वर्याने आराध्यासह एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Aishwarya Rai Bachchan
Aishwarya Rai BachchanDainik Gomantak

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) नेहमीच वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मिडियावर चर्चेत असते. ऐश्वर्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. ऐश्वर्याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. पण काही नेटकऱ्यांनी या फोटोला कमेंट करुन ऐश्वर्याला ट्रोल करत आहेत. 

ऐश्वर्याची सोशल मिडिया पोस्ट

ऐश्वर्याची (Aishwarya Rai Bachchan) मुलगी आराध्याचा 11 वा मोठ्या आनंदात साजरा केला गेला. यानिमित्त ऐश्वर्याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये ऐश्वर्या ही आराध्याला लिप किस करताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन दित लिहिले, 'माय लव्ह, माय लाइफ, माय आराध्या' ऐश्वर्याच्या या फोटोला अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करुन आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Aishwarya Rai Bachchan
Aishwarya Rai BachchanDainik Gomantak

सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी ऐश्वर्यानं शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन तिला ट्रोल केले आहे. 'असा फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर करु नका' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली. तर एका युझरनं कमेंटमध्ये लिहिलं, 'ही भारतीय संस्कृती नाही. हे लज्जास्पद आहे.'


काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या पोन्नियिन सेलवन या चित्रपटामधून (Movie) ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. मणिरत्नम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com