Ajay Devagn :आता अजय देवगनचा भोला येणार प्रेक्षकांच्या भेटीला..पोस्टर रिलीज, टिजरही लवकरच..

अजय देवगनने त्याच्या आगामी भोला चित्रपटाचं पोस्टर इंन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.
Ajay devagn
Ajay devagn Dainik Gomantak

अभिनेता अजय देवगन सध्या चांगलात जोमात आहे. दृश्यम चित्रपटाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर आता अजय त्याचा पुढचा चित्रपट 'भोला'च्या प्रमोशनच्या तयारीत आहे.

'दृश्यम 2' मध्ये पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी ठरलेला विजय साळगावकर आता नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

कपाळावर भस्म, हातात श्रीमद भगवद्गीता, अशा अवतारात अजय देवगण त्याचा बहुप्रतिक्षित 'भोला' चित्रपट घेऊन चित्रपटगृहात परतत आहे आणि याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

 नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाच्या पहिल्या टीझरने प्रेक्षकांमध्ये खळबळ माजवणारा अजय देवगण हळूहळू चित्रपटाचे पत्ते प्रेक्षकांसमोर उघडत आहे. 'भोला' चित्रपटाचे रोज एक ना काही अपडेट अजय देवगनकडुन येत राहतात.

आजही अशा काही बातम्या आल्या आहेत, ज्यामुळे अजय देवगणचे चाहते आनंदाने उड्या मारतील. आणि ही बातमी म्हणजे 'भोला'च्या दुसऱ्या टीझरची रिलीज डेट समोर आली आहे.

Ajay devagn
S.S Rajamauli-James Cameron 'अवतार'चा दिग्दर्शक राजामौली यांच्यासोबत बनवणार पुढचा चित्रपट?

हितेन तेजवानीचा आणखी एक प्रयत्न यशस्वी झाला. अजयच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव आहे, ज्यामुळे चित्रपटातील अजय देवगनचे पात्र आणखीनच रहस्यमय बनते. हे अप्रतिम पोस्टर शेअर करताना अजयने लिहिलंय, 'तीन दिवसांत अनस्टॉपेबलचा अनुभव घ्या.

'चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट करत आहेत आणि त्यांच्या चित्रपट आणि टीझरबद्दल उत्सुकता असल्याचं दाखवत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com