Drishyam 2 ची छप्परफाड कमाई! सातव्या दिवशी केला 100 कोटींचा टप्पा पार

Drishyam 2 Box Office Day 7: अभिनेता अजय देवगण, अक्षय खन्ना, श्रिया सरन आणि तब्बू यांच्या 'दृश्यम 2' (Drishyam 2) या चित्रपटाने सात दिवसांत 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
Ajay Devgn
Ajay DevgnDainik Gomantak

Drishyam 2 Box Office Day 7: 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला 'दृश्यम 2' हा चित्रपट 2,100 कोटीच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. अभिनेता अजय देवगण, अक्षय खन्ना, श्रिया सरन आणि तब्बू यांच्या 'दृश्यम 2' (Drishyam 2 ) या चित्रपटाने सात दिवसांत 100 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. मात्र, आता चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो, कारण वरुण धवन आणि क्रिती सेननचा भेडिया (Bhediya) रिलीज झाला आहे. मात्र हा चित्रपट कितपत यशस्वी होतो, हे प्रेक्षकच ठरवतील.

दृष्यम 2 ची कमाई

दृष्यम 2 हा चित्रपट या वर्षी टॉप ओपनर चित्रपटांमध्ये सामील आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 40.38 टक्क्यांनी वाढून 21.59 कोटी रुपये झाले. तिसऱ्या दिवशीही चित्रपटाच्या कलेक्शनचा वेग वाढला आणि 27.17 कोटींचे कलेक्शन झाले.

Ajay Devgn
Drishyam 2 Collection Day 6: 'बॉक्स ऑफिसवर दृश्यम 2'चा बोलबाला; सहाव्या दिवशी इतक्या कोटींची कमाई

तसेच, वीकेंडनंतर पहिल्या सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 56.31 टक्क्यांची घसरण झाली आणि चित्रपटाने 11.87 कोटी कमावले. दुसरीकडे, चित्रपटाचे कलेक्शन पाचव्या दिवशी 10.65 कोटी आणि सहाव्या दिवशी 9.55 कोटी होते. आता सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, चित्रपटाने सातव्या दिवशी 8.70 कोटी रुपये कमावले असून एकूण कलेक्शन 100 कोटींच्या पुढे गेले आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 105 कोटी रुपये आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com