Thank God Controversy: रिलीजपूर्वीच अजय देवगणचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

Thank God In Legal Trouble: अजय देवगणचा आगामी चित्रपट थँक गॉड रिलीज होण्याआधीच वादांना तोंड देत आहे.
Thank God Controversy
Thank God ControversyDainik Gomantak

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचा आगामी चित्रपट 'थँक गॉड' (Thank God) च्या समस्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून तो वादात सापडला आहे. चित्रपटातील चित्रगुप्ताच्या दृश्याबाबत लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. याबाबत कायस्थ समाजाच्या लोकांनी चित्रपट निर्मात्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

सर्वांना माहित आहे की, अजय देवगण (Ajay Devgn ) आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर 'थँक गॉड'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून अनेकांनी ट्रेलरचे कौतुक केले. ट्रेलरमध्ये अजय चित्रगुप्ताच्या भूमिकेत दिसला आहे. पण कायस्थ समाजाच्या लोकांना ही गोष्ट पचनी पडली नाही.

या चित्रपटात (Movie) हिंदू धर्माची कथितपणे खिल्ली उडवण्यात आल्याचा आरोप समाजाने केला आहे. चित्रपटात चित्रगुप्त आधुनिक कपड्यांमध्ये दाखवण्यात आला असून तो महिलांनी वेढलेला दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Thank God Controversy
Priyanka Chopra ने न्युयॉर्क इव्हेंटचा शेअर केला व्हिडिओ , 'देसी गर्ल' परदेशात खाताना दिसली पाणीपुरी

कायस्थ समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली निहालगंज पोलीस ठाण्यात आदल्या दिवशी थँक गॉड चित्रपटाबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. वृत्तानुसार, अजय देवगण, निर्माता टी-सीरीज आणि इतर चित्रपट निर्मात्यांविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. यासोबतच ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला चित्रगुप्ताचा सीनही चित्रपटातून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

हा चित्रपट 24 ऑक्टोबरला रिलूज होणार
इंद्र कुमार दिग्दर्शित 'थँक गॉड' हा कॉमेडी चित्रपट 24 ऑक्टोबर रोजी देशभरात रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच नोरा फतेहीचे या चित्रपटात एक जबरदस्त आयटम साँग देखील आहे, जे सध्या खूप व्हायरल होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com