अजय देवगण इंग्लिश शोच्या रिमेकमधून करणार 'OTT' प्लॅटफॉर्मवर पदार्पण

दैनिक गोमंतक
रविवार, 18 एप्रिल 2021

अजय आपल्या पुढच्या प्रोजेक्टची खुशखबर आपल्या चाहत्यांना देण्याच्या तयारीत आहे.

अजय देवगनने नुकतीच त्याच्या अपकमिंग फिल्म 'गोबर' बद्दल माहिती दिली होती. आता बातमी झाली आहे की अजय आपल्या पुढच्या प्रोजेक्टची खुशखबर आपल्या चाहत्यांना देण्याच्या तयारीत आहे. अजय देवगन आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजय ब्रिटिश शो 'लूथर' च्या रीमेकमध्ये काम करताना दिसणार आहे. 'लूथर' शोच्या रीमिकेला वेब सिरीजमध्ये बनवलं जाईल.(Ajay Devgn will make his debut on the OTT platform in a remake of the English show)

अभिनेता सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह

लूथरच्या रीमेकमधून अजय देवगन ओटीटी प्लेटफॉर्म पदार्पण करणार आहे. याबाबद्दलची घोषणा निर्माते पुढच्या आठवड्यात करतील. अजय देवगनने या वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी होकार दिलेला आहे. 'लूथर' एक सायकोलॉजिकल क्राइम थ्रिलर ब्रिटिश शो आहे, इरिडिस अल्बा यांनी त्यात प्रमुख भूमिका केलेली आहे. या वेब सीरीजला बीबीसी इंडिया आणि एप्लॉज एंटरटेन्मेंट निर्मित करतील. चित्रीकरण झाल्यांनतर या वेब सिरीजला डिस्नी प्लस हॉटस्टारवरती प्रदर्शित केले जाईल.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

दरम्यान अजय देवगन  52 वर्षाचा असून गेली 20 वर्ष झाले तो चित्रपटसृष्टीमध्ये काम करतोय. अजय देवगनने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेले आहेत. त्याचबरोबर अजय देवगन आगामी काळात रेड 2, गोबर, सूर्यवंशी, गोलमाल 5 अशा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अजय देवगन असा एकमेक स्टार आहे जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अनेक सिरीज गाजलेल्या आहेत. सॅक्रेड गेम्स, मिर्जापूर, क्रिमिनल जस्टिस अशा वेब सीरिजमधून निर्मात्यांना फायदा झाला होता.

संबंधित बातम्या