एजाज खानने दिले स्पष्टीकरण; पत्नीचा गर्भपात झाल्याने...

दैनिक गोमंतक
बुधवार, 31 मार्च 2021

यापूर्वी 2018 मध्ये  सुद्धा एजाजला ड्रग्ज संबंधित प्रकरणात अटक केली गेली आहे.

छोट्या पडद्यावरील रियलिटीशो बिग-बॉसचा माजी स्पर्धक एजाज खानला एनसीबीने (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) अटक केली आहे. मंगळवारी एनसीबीने एजाज खानला  चौकशीसाठी ताब्यात घेल्याचे समजते आहे. त्यानंतर, एनसीबीने एजाज खानशी संबंधित इतर काही ठिकाणीही छापे टाकले. अटक झाल्यानंतर अभिनेता एजाज खानने आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.(Actor Ejaz Khan has denied the allegations made by the NCB citing his wife miscarriage.) 

The Beauty of Living Twice: हॉलिवूड अभिनेत्रीने उघड केला वैयक्तिक आयुष्यातील...

या प्रकरणावर बोलताना अभिनेता एजाज खानने एनसीबीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बुधवारी न्यायालयात हजर होण्यापूर्वी एनसीबीने (NCB) एजाज खानची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. एजाज खान म्हणाले, माझ्या घरातून फक्त झोपेच्या चार गोळ्या सापडल्या. माझ्या पत्नीचा गर्भपात झाला होता, त्यामुळे मानसिक ताणतणावातून जात असल्याने पत्नीने या औषधींचा वापर केला आहे.' दरम्यान, एजाजच्या आठ तासांच्या चौकशीनंतर त्याला एनसीबीने अटक केली असल्याचे समजते आहे.

यापूर्वी 2018 मध्ये  सुद्धा एजाजला (Ajaj Khan) ड्रग्ज संबंधित प्रकरणात अटक केली गेली आहे. बेलापूरमधील हॉटेलच्या खोलीतून त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून बंदी घातलेली औषधे (Drugs) वापरल्याचा आरोप त्यावेळी त्यांच्यावर होता. मात्र त्यावेळीही एजाज खानवर लावलेले आरोप त्याने नाकारले होते. तसेच आपल्यावर झालेल्या आरोपाबद्दल ट्विट करत आपली बाजू मंडळी होती.

संबंधित बातम्या