अक्षय कुमार शंभर नंबरी

Dainik Gomantak
शनिवार, 6 जून 2020

जागतिक श्रीमंत सेलिब्रेटींच्या यादीत बॉलीवूडचा एकमेव कलाकार

मुंबई

हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता अक्षय कुमार रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करताना सामाजिक कार्यातही सहभागी होणाऱ्या अक्षय कुमारचे नाव जगातील श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत समाविष्ट झाले आहे. हे स्थान मिळालेला हिंदी चित्रपटसृष्टीतील तो एकमेव अभिनेता आहे.
"फोर्ब्स' नियतकालिकाने जून 2019 ते मे 2020 या काळातील जगातील सर्वांत श्रीमंत 100 सेलिब्रिटींची नावे नुकतीच जाहीर केली. या यादीत अक्षय कुमार 52 व्या स्थानावर आहे. त्याची वर्षाची कमाई 48.5 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 366 कोटी रुपये आहे. या यादीमध्ये स्थान पटकावणारा अक्षय कुमार हा एकमेव बॉलीवूड अभिनेता आहे. गेल्या वर्षीही अक्षयला या यादीत स्थान मिळाले होते. तेव्हा त्याची कमाई 65 दशलक्ष डॉलर (सुमारे 444 कोटी रुपये) होती. यंदा अक्षयच्या कमाईत घसरण झाल्याचे दिसत आहे.
या वर्षी अक्षयचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये सुरू होतील, असे दिसते. तेव्हाच अक्षयचा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे.

कायली जेन्नर पहिली
"फोर्ब्स'च्या यादीत बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनास, केन वेस्ट, रॉजर फेडरर, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, टायलर पेरी, नेमार, हॉवर्ड स्टर्न, लेब्रॉन जेम्स, ड्‌वेन जॉन्सन यांचा समावेश आहे. पहिले स्थान पटकावणाऱ्या कायली जेन्नर या मॉडेलची कमाई 590 दशलक्ष डॉलर (जवळपास 445 कोटी रुपये) आहे.

संबंधित बातम्या