30 Years of Akshay Kumar: अक्षय कुमारने बॉलिवुडमध्ये केली 30 वर्षे पूर्ण, यशराज फिल्म्सने दिले खास भेट

यश राज प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
30 Years of Akshay Kumar: अक्षय कुमारने बॉलिवुडमध्ये केली 30 वर्षे पूर्ण, यशराज फिल्म्सने दिले खास भेट
Akshy Kumaar Dainik Gomantak

बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) गेली 30 वर्ष बॉलिवूड इंड्रीमध्ये काम करत आहे. अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' (Prithviraj) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यानिमित्त यश राज फिल्म्सनं 'पृथ्वीराज' या चित्रपटाचं नवं पोस्टर लाँच केलं आहे. हे पोस्टर खास आहे कारण या पोस्टरचं डिझाइन अक्षयच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांच्या फोटोपासून तयार करण्यात आले आहे. यश राज प्रोडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय हा पृथ्वीराजचं नवं पोस्टर पाहताना दिसत आहे.

यश राज प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या इनस्टागग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय असं म्हणतो, 'सौगंध' हा माझा चित्रपट रिलीज होऊन आज 30 वर्ष झाली आहेत. मी सर्वांचे आभार मानतो. हे माझ्यासाठी खूप खास आहे.' पृथ्वीराज चित्रपटामध्ये (Movie) एका योद्ध्याची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज चौहान' यांच्या जीवनावर आधारित असणार आहे.

पृथ्वीराज चित्रपटाचे डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'चाणक्य' आणि 'पिंजर' या प्रोजक्ट्सचं लोक आजही कौतुक करतात. 'पृथ्वीराज' चित्रपटामध्ये मानुषी छिल्लर ही 'संयोगिता' ही भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 3 जून रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.