BELL BOTTOM साठी मानधन कमी केल्याच्या चर्चेला अक्षय कुमारने स्वतः दिले उत्तर

BELL BOTTOM साठी मानधन कमी केल्याच्या चर्चेला अक्षय कुमारने स्वतः दिले उत्तर
akshay kumar.jpg

बॉलीवु़डचा (Bollywood) खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमीच आपल्या वेगवेगळ्या भुमिकांमूळे चर्चेत असतो. वेगवेगळ्या भुमिकांमुळे तो आपल्या त्याचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. त्यातच आता अक्षय कुमार 'बेल बॉटम' (Bell Bottom) हा नविन चित्रदट घेउन येत आहे. या चित्रटाची चर्चा सुरु असतानाच अक्षय अजुन एका विषयावरचर्चा सुरु आहे. तो विषय म्हणजे अक्षय कुमारचे मानधन या विषयावर आता अक्षय कुमारने स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. (Akshay Kumar has reacted to the talk of reducing fees)

अक्षयने चित्रपटाचे मानधन कमी केले असल्याच्या सोशल मिडीयावर चर्चा सुरु होत्या. यावर स्वतः अक्षय कुमारने प्रतिक्रीया दिल्या नंतर या चर्चांना पुर्णविराम लागला आहे. मानधन कमी झाल्याची ही माहिती चुकीची असल्याचे अक्षय कुमारने सांगितले आहे. अशाच आशयाच्या एका बातमीवर प्रतिक्रीया देसाना अक्षय कुमारचा राग अनावर झाल्याचे दिसले आहे. झोपेतुन उठताच अशी बातमी पाहिल्यावर अक्षयला वाईट वाटत असल्याचे दिसते आहे. 

वाशु भग्णानी यांनी अक्षयला बेलबॉटम चित्रपटासाठी घेणाऱ्या मानधनात 30 कोटी कमी घेण्याची विनंती केली होती आणि ती अक्षयने देखील मान्य केली असे एका बातमीत सांगण्यात आले होते. यावर प्रतिक्रीया देताना अक्षय कुमारने बेलबॉटम साठीचे मानधन सांगितले नसले तरी, हे वृत्त चुकिचे असल्याचे स्पष्ट केले आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com