Akshay Kumar-Imran Hashmi : अक्षय कुमार आणि इमरान हाशमीच्या 'सेल्फी'चे पोस्टर रिलीज

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांची प्रमुख भूमीका असणारा 'सेल्फी'या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे.
Akshay Kumar
Akshay Kumar Imran Hashmi

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. हे दोघे करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या 'सेल्फी'मध्ये दिसणार आहेत. सध्या निर्मात्यांनी मोशन पोस्टर रिलीज करून चाहत्यांना खूश केले आहे. सेल्फी कधी रिलीज होईल आणि स्टारकास्टपासून पोस्टरपर्यंत सगळंच आम्ही आज सांगणार आहोत.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने चाहत्यांना नवे सरप्राईज दिले आहे. त्याच्या 'सेल्फी' या नव्या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. यासोबतच 'सेल्फी'ची रिलीज डेटही जाहीर झाली आहे. 'सेल्फी'मध्ये अक्षय कुमार इमरान हाश्मी सोबत दिसणार आहे. हे दोन्ही तगडे अभिनेते  पहिल्यांदाच पडद्यावर समोरासमोर दिसणार आहेत.

 बॉक्स ऑफिसवर 'सेल्फी'ची किमया कशी होते हे निर्माते आणि प्रेक्षकांच्याही जवळून पाहायला मिळणार आहे. वास्तविक अक्षय कुमारचे यापूर्वीचे चित्रपट काही विशेष दाखवू शकले नाहीत. चला 'सेल्फी'चे मोशन पोस्टर पाहुया

Akshay Kumar
Hot Scenes From Bollywood :आपल्या पहिल्याच चित्रपटात या अभिनेत्रींनी हॉट सीन्स देऊन आग लावली होती..

करण जोहरनेही 'सेल्फी'चे पोस्टर शेअर केले आहे. सेल्फी पोस्टरची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे. या पोस्टरमध्ये इमरान हाश्मी युनिफॉर्ममध्ये दिसत आहे, तर अक्षयचा लूकही अप्रतिम दिसत आहे.

 दोघेही रागावलेले आणि समोरासमोर उभे ठाकलेले दिसत आहेत.  पुढच्या महिन्यात 24 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com