चित्रपटातील हिरो खऱ्या हिरोंच्या भेटीला

ARMY.jpg
ARMY.jpg

बॉलिवूडचा (bollywood) प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar)केवळ चित्रपटांमधूनच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही देशभक्ती (patriotism) दाखवतो , तो  नेहमीच सैन्य (Military) दलातील जवानांना (soldiers)  प्रोत्साहन देतो आणि त्यांचे मनोबल वाढवताना देखील दिसतो. सैनिकांना भेटण्यासाठी अक्षय कुमार पुन्हा एकदा काश्मीरमधील (Kashmir) सैन्याच्या अ‍ॅडव्हान्स पोस्टवर पोहोचला. या काळात शहीद (Martyr) झालेल्या सैनिकांना अक्षयने श्रद्धांजली(Tribute)वाहिली आणि सैनिक व अधिकारी यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढविले. यासंदर्भात बीएसएफने(BSF )एक ट्विट केले असून यामध्ये अक्षय कुमार आणि बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना सीमेवर पहारा देताना शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.(Akshay Kumar met the soldiers)

बीएसएफने आपल्या ट्वीटमध्ये (Tweet) लिहिले आहे: "डीजी बीएसएफ राकेश अस्थाना यांनी कर्तव्याच्या धर्तीवर सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आणि त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करणारे सीमा रक्षकांना मनापासून श्रद्धांजली वाहिली. अक्षयने ही त्यांच्यासोबत जाऊन शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली." 

बीएसएफ काश्मीरनेही या संदर्भात एक ट्विट केले होते: "देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अशा परिस्थितीत अक्षय कुमार पुन्हा एकदा सीमेच्या सुरक्षेत तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांना भेटायला आले." बीएसएफ काश्मीरनेही आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार सैनिकांना भेटताना दिसत आहेत.एवढंच नव्हे तर अक्षयने जवानांसोबत पंजा देखील लढवला. अक्षयचे फोटोज आणि व्हिडीओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

अक्षय कुमारच्या सिनेमांनबद्दल बोलायला गेलं तर  तो आता 'रक्षाबंधन', 'बच्चन पांडे', 'पृथ्वीराज' आणि 'राम सेतु' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अक्षयच्या ‘बेलबॉटम’ या चित्रपटावर बराच काळ अडकल्यानंतर रिलीजची तारीख जाहीर झाली आहे. त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बेलबॉटम' 27 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com