Prithviraj Trailer: 'पृथ्वीराज' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, खिलाडीचा दिसणार राजेशाही अंदाज

अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे.
Prithviraj Trailer: 'पृथ्वीराज' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, खिलाडीचा दिसणार राजेशाही अंदाज
Prithviraj TrailerInstagram

अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'पृथ्वीराज' चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय राजेशाही स्टाईलमध्ये दिसत आहे. या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर येथे राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरमध्ये संजय दत्तही एका शूर योद्धाच्या भूमिकेत दिसला आहे. (Prithviraj Trailer News)

अक्षय कुमारने (Akshy Kumar) इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'पृथ्वीराज' चित्रपटाच्या ट्रेलरचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने सुंदर कमेंट लिहिली आहे. त्याने लिहिले 'शौर्य आणि वीरता ची अमर कथा… ही कथा सम्राट पृथ्वीराज चौहान यांची आहे'

Prithviraj Trailer
प्रियांका चोप्राने प्रथमच शेअर केला लेकीचा फोटो

यशराज फिल्मच्या बॅनरखाली निर्मित हा चित्रपट (Movie) महान राजा पृथ्वीराज चौहान यांच्यावर आधारित आहे. याचे दिग्दर्शन चंद्र प्रकाश द्विवेदी करत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरशिवाय संजय दत्त आणि सोनू सूद देखील दिसणार आहेत. या चित्रपटातून मानुषी छिल्लरही बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 3 जानेवारी 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट हिंदी, तामीळ, तेलगू या भाषेमध्ये पाहायला मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.