अक्षय कुमारने लावला 'सूर्यवंशी' आणि 'बेल बॉटम' च्या अफवांवर पूर्णविराम

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 मे 2021

बॉलिवूड(Bollywood) स्टार अक्षय कुमारने(Akshay Kumar) अखेर आपल्या ‘सूर्यवंशी’(Sooryavanshi) आणि ‘बेल बॉटम’(Bell Bottom) या चित्रपटांच्या रिलीज तारखांविषयी वाढत्या चर्चेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली.

बॉलिवूड(Bollywood) स्टार अक्षय कुमारने(Akshay Kumar) अखेर आपल्या ‘सूर्यवंशी’(Sooryavanshi) आणि ‘बेल बॉटम’(Bell Bottom) या चित्रपटांच्या रिलीज तारखांविषयी वाढत्या चर्चेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. अक्षयचे हे दोन्ही चित्रपट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार असल्याची अफवा पसरविली जात होती. मात्र स्वतः अक्षयने हे दावे फेटाळले आहेत. एका निवेदनात अक्षय कुमारने सांगितले की आपल्या चाहत्यांचा उत्साह बघून त्याला आनंदच होत आहे. परंतु त्यांनी यावर भर दिला की त्यांचे चित्रपट निर्माते चित्रपटगृहातच 'सूर्यवंशी' आणि 'बेल बॉटम'  प्रदर्शित करण्याबाबत स्पष्ट आहेत आणि हे निश्चित आहे की हे दोन्ही चित्रपट एकाच तारखेला प्रदर्शित होणार नाहीत.(Akshay Kumar says Sooryavanshi and Bell Bottom will not be released on Independence Day)

चाहत्यांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद 

'सूर्यवंशी' आणि 'बेल बॉटम' च्या रिलीजबद्दल चाहत्यांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद 
अक्षय म्हणाला की, 'सूर्यवंशी' आणि 'बेल बॉटम' च्या रिलीजसाठी चाहत्यांच्या उत्साह आणि उत्सुकतेमुळे मी भारावून गेलो आहे. मला त्यांच्या मनाच्या मनापासून आभार मानायचे आहे. तथापि, सध्या हे दोन्ही चित्रपट स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार आहेत हे सांगणे पूर्णपणे चुकीचे आहे. दोन्ही चित्रपटाचे निर्माते रिलीजच्या तारखांवर काम करत आहेत आणि त्या तारखा तवकरच योग्य वेळी जाहीर करण्यात येतील."

Radhe: चित्रपटाच्या पायरसीवरून दिल्ली उच्च न्यायलायचे व्हॉट्सअ‍ॅपला कारवाईचे आदेश 

‘सूर्यवंशी’ थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा 

‘सूर्यवंशी’ च्या निर्मात्यांना हा चित्रपट केवळ चित्रपटगृहात प्रदर्शित व्हावा अशा बातम्या ट्रेंडींगमध्ये आहे. 'सूर्यवंशी' आणि 'बेल बॉटम' च्या चित्रपटाच्या स्टोरी देशभक्तीने प्रेरित आहेत आणि कोरोनामुळे हे दोन्ही चित्रपट गेल्या एक वर्षापासून पुढे ढकलले जात आहेत. दोन्ही चित्रपट वीकेंड हॉलिडेवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सलमान खानच्या 'राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई' रिलीज झाल्यानंतर अनेकदा 'सूर्यवंशी' रिलीज होण्याच्या वृत्तानंतर अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि बॉलिवूडमधील इतर स्टार्सही असाच निर्णय घेतील असे मत व्यक्त केले जात होते. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' सुरुवातीला 24 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. पण नंतर कोविड -19च्या संकटामुळे मेकर्सनी या चित्रपटाची रीलीज डेट पुढे ढकलली कारण देशभरातील थिएटर्स या काळात बंद होती.

बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयसोबत सामंथाला करायचाय रोमांन्स 

जूनमध्ये रिलीज होण्याची शक्यता

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या 'सूर्यवंशी' वर अजय देवगन-स्टारर 'सिंघम', 'सिंघम रिटर्न्स' आणि रणवीर सिंगचा 'सिम्बा' नंतरचा जून महिन्यात प्रदर्शित होणारा 'बेल बॉटम' हा चौथा चित्रपट आहे. त्याच वेळी, अक्षय कुमारचा हेरगिरी करणारा थ्रिलर 'बेल बॉटम' जो 2 एप्रिल 2021 रोजी रिलीज होणार होता तो देखील कोरोनामुळे निर्मात्यांनी पुढे ढकलला होता. मिळालेल्या माहितीनुसार आता हे चित्रपट जूनमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या