अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन

अक्षय कुमारने (Akshay Kumar) सोशल मीडियावरील ट्विटर अकाउंटवर शेअर करत ही माहिती दिली.
अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन
Akshay Kumar's mother Aruna Bhatia passes away Dainik Gomantak

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) आई अरुणा भाटियाची (Aruna Bhatia) यांचे आज निधन झाले आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावरील ट्विटर अकाउंटवर शेअर करत हि माहिती दिली. अक्षयने पोस्ट शेअर करत लिहिले आहे, ''ती माझी गाभा होती. आणि आज मला माझ्या अस्तित्वाच्या मुळाशी असह्य वेदना जाणवते. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया आज सकाळी शांतपणे या जगाचा निरोप घेऊन माझ्या वडिलांसोबत दुसऱ्या जगात गेली . मी आणि माझे कुटुंब या काळातून जात असल्याने मी तुमच्या प्रार्थनांचा आदर करतो, ओम शांती''.

Akshay Kumar's mother Aruna Bhatia passes away
कॉमेडियन Bharti Singhने घटवले 15 किलो वजन

अरुणा भाटिया त्यांना सोमवारी मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते .आईची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून लगेच मुंबईला परतला होता. अक्षय कुमार लंडनला त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता.

अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी सिंड्रेला चित्रपटाचे शूटिंग करत होता. अक्षय त्याच्या आईच्या खूप जवळ आहे. आईची तब्येत बरी नसल्याने अक्षयने आईसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. ज्यासाठी तो लगेच भारतात परतला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com