Akshay Kumar Upcoming Movie: आता अक्षयकुमार देणार सेक्स एज्युकेशन...

सायफाय वेबसीरीजमध्येही दिसणार, दोन्ही प्रोजेक्टविषयी दिली माहिती
Akshaya kumar
Akshaya kumarDainik Gomantak

Akshay Kumar Upcoming Movie: अभिनेता अक्षयकुमारने नुकतेच त्याच्या आगामी चित्रपट आणि वेबसीरीजची माहिती दिली. सध्या अक्षय दोन प्रोजेक्टवर काम करत असून त्यातील एक सायन्स फिक्शन वेबसीरीज आहे. तर दुसरा प्रोजेक्ट सेक्स एज्युकेशनवर आधारीत चित्रपट असणार आहे.

Akshaya kumar
TikTok Star Megha Thakur Dies: 21 वर्षीय टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचा अचानक मृत्यू, नेमकं कारण काय?

रेडी सी इंटरनॅशनल अॅवॉर्डमध्ये आलेल्या अक्षयकुमारने प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. अक्षयने त्याच्या बहुप्रतिक्षीत वेबसीरीज 'द एंड' (याचे नाव बदलले जाण्याची शक्यता आहे) याविषयीही बातचीत केली. अक्षय म्हणाला की, सध्या या दोन्ही प्रोजेक्टच्या पटकथांचे काम पुर्ण झाले असून लवकरच शुटिंगला सुरवात होणार आहे.

दरम्यान, या निमित्ताने पहिल्यांदाच अक्षय कुमार वेबसीरीजमध्ये काम करणार असून याद्वारे तो डिजिटल स्पेसमध्ये पदार्पण करणार आहे. सायन्स फिक्शन वेबसीरीजसह दुसरा प्रोजेक्ट एक अॅक्शन ड्रामा असणार आहे.

अक्षय म्हणाला की, चित्रपट जो आहे तो सेक्स एज्युकेशन सारख्या विषयावर आधारीत आहे. मला सामाजिक चित्रपट करायला आवडतात. मी असे चित्रपट करू इच्छितो ज्यातून लोकांच्या जीवनात बदल आणता येईल. विशेषतः माझ्या देशातील लोकांच्या किंवा एकुणच देशात सकारात्मक बदल घडवता येईल. मी अशा विषयांवरून चित्रपट बनवतो, पण असे चित्रपट करताना ते कमर्शिअल पद्धतीने बनवतो. कारण त्यात कॉमेडी, ड्रामा, ट्रॅजेडी यांसह गाणीही असतात.

Akshaya kumar
TikTok Star Megha Thakur Dies: 21 वर्षीय टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचा अचानक मृत्यू, नेमकं कारण काय?

दरम्यान, या चित्रपटाच्या शीर्षकाबाबत अक्षयने काहीही सांगितले नाही. हा चित्रपट रीलीज व्हायला अद्याप खूप अवधी आहे. कदाचित एप्रिल किंवा मे महिन्यात हा चित्रपट रीलीज केला जाईल. आता एवढेच सांगू शकतो की, हा चित्रपट माझा आत्तापर्यंतचा सर्वात चांगला चित्रपट असेल.

दरम्यान, हे वर्ष अक्षयसाठी वाईट ठरले आहे. त्याचे चार चित्रपट रीलीज झाले, पण त्यांना बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी करता आली नाही. अक्षयचे पृथ्वीराज, बच्चन पांडे, रामसेतू हे चित्रपट बॉक्सऑफिसवर अयशस्वी ठरले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com