Selfie Trailor : अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीच्या 'सेल्फी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

अभिनेता अक्षय कुमार आणि इमरान हाशमी यांच्या आगामी 'सेल्फी'चं ट्रेलर नुकतंच रिलीज झालं आहे
Akshay Kumar 
Imran Hashmi
Akshay Kumar Imran Hashmi Dainik Gomantak

अभिनेता अक्षय कुमार आणि इमरान हाशमी यांचा आगामी सेल्फी नावाचा चित्रपटाने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. या चित्रपटाचे पोस्टर अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर शेअर केले होते.त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

अक्षय कुमारसाठी 2022 खूप वाईट ठरले. त्याचे जवळपास सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ फ्लॉप झाले . पण आता अक्षयला २०२३ कडून खूप आशा आहेत. 'सेल्फी' चित्रपटाच्या ट्रेलरने त्याची चांगली सुरुवात केली आहे, असंच म्हणावं लागेल.

अक्षयच्या आगामी 'सेल्फी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 'सेल्फी'मध्ये इमरान हाश्मी देखील आहे आणि अक्षयसोबतची त्याची दमदार केमिस्ट्रीसुद्धा ट्रेलरमधुन दिसत आहे.

अक्षय कुमार 'सेल्फी'मध्ये सुपरस्टार विजयच्या भूमिकेत दिसणार आहे.'सेल्फी' हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट असून त्यात किती मसाला पाहायला मिळणार आहे, त्याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून आली आहे. ट्रेलर रिलीज झाल्याची माहिती स्वत: अक्षय कुमारने त्याच्या ऑफिशियल ट्विट्टर अकाउंटवरुन दिली आहे

Akshay Kumar 
Imran Hashmi
Sushmita Sen : सुष्मिता सेनने घेतली 1.63 कोटी किमतीची ही सुपरकार

इमरान हाश्मी आणि अक्षयने 2013 मध्ये आलेल्या 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघेही 'सेल्फी'मध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे इमरान हाश्मी दीर्घ काळानंतर चित्रपटाच्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com